Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंंचाई तीव्र

Water Issue : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. सध्या ३२ गावांमध्ये ४४ टँकरने पाणीपुरवठा होतो. टँकर भरण्यासाठी ४९ खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Chalisgaon News : चाळीसगाव तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. सध्या ३२ गावांमध्ये ४४ टँकरने पाणीपुरवठा होतो. टँकर भरण्यासाठी ४९ खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीटंचाईची गावे पन्नाशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. प्रशासनस्तरावर पाणीटंचाई निवारणार्थ सध्या कसरत सुरू आहे. गेल्या वर्षी ज्या गावांना पाण्याची टंचाई भासली नव्हती, यंदा अशाही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : सातारा जिल्ह्यात १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. एप्रिलमध्येच टँकरची संख्या ४४ वर गेली आहे. अजून मे महिना जाणे बाकी आहे. गिरणा परिसर नदीमुळे सुजलाम सुफलाम मानला जातो. पाण्याचे स्रोत कमी होऊन रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी अवघ्या एक ते दोन तासांवर येऊन ठेपल्या आहेत. गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांनी ऊस, केळी, उन्हाळी कांदा तर गुरांसाठी चारा लागवड केली आहे. अजून एप्रिलचा अर्धा महिना व मे संपूर्ण बाकी असताना एप्रिलमध्येच विदारक परिस्थिती निर्माण झाली असून पुढे कसे होणार? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

२२ खेड्यांना फटका

नाशिक जिल्ह्यातही मागीलवर्षी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने सद्यःस्थितीत गिरणा धरणात केवळ २१ टक्के जलसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर चाळीसगाव शहरातील पाणीपुरवठा तसेच गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी एप्रिल संपेपर्यंत चाळीसगाव तालुक्यात ५० टँकर सुरू होतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. या धरणात पाणी नसल्याने त्याचा फटका २२ खेड्यांना सहन करावा लागत असून तेथील ग्रामस्थांची भटकंती होत आहे.

Water Scarcity
Water Shortage : मालवाहू घोड्यांवर ‘पाणीबाणी’

या गावांत टँकर सुरू

विसापूर तांडा, अंधारी, करंजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, रोहिणी, तमगव्हाण, राजदेहरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, भिल्ल वस्ती, खराडी, डोणदिगर, पिंप्री बु. प्र. दे., तळेगाव, न्हावे, ढोमणे, म्हाळशेवगा, शिंदी, पिंपळगाव, चत्रभूज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जूनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र. दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा एक या गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीटंचाईचे चित्र

३२ गावे

४४ टँकर

४९ विहिरी अधिग्रहण

८०,६९४ लोकसंख्या

५५,७६२ पशुधन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com