Summer Heat : ग्रामीण भागात उन्हाचा पारा वाढला

Water Scarcity : ग्रामीण भागात पारा वाढत असल्याने उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
Summer Heat
Summer HeatAgrowon
Published on
Updated on

Drought Update : ग्रामीण भागात पारा वाढत असल्याने उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. रानोमाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना दुपारी सावलीचा शोध घ्यावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने अनेक भागात पाणीटंचाईतही वाढ होत आहे.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरातील उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी शेळी-मेंढपाळ करतात. सध्या शेतशिवारात शेळ्या व मेंढ्यांना खाद्य मिळत नसल्याने रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

याशिवाय शेतकऱ्यांकडून खतासाठी शेतात शेळ्या बसवल्या जातात. उन्हाचा पारा वाढत असल्याने दुपारच्यावेळी सावलीचा शोध घेऊन शेळ्या-मेंढ्यांना झाडाच्या आसऱ्याला बसवले जाते. मार्च संपून एप्रिल सुरू होताच उन्हाची दाहकता वाढायला लागली.

Summer Heat
Water Scarcity : पाणीटंचाईचे अर्थकारण

शेतशिवारात जाणाऱ्या जनावरांचाही सध्या लाहीलाही होत आहे. सूर्य सकाळपासून आग ओकत असल्याने उकाड्यापासून पशुपक्षीही हैराण झाले आहेत. उन्हाच्या चटक्यामुळे लाहीलाही होत असल्याने झाडाझुडपांच्या सावलीत जनावरे थांबत आहे.

Summer Heat
Water Scarcity : खानदेशात पाणीटंचाई वाढू लागली

यंदा पाण्याची टंचाई

यंदा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मेंढपाळांना पाणी असलेल्या भागातच चराईसाठी न्याव्या लागतात. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांकडून शेतात शेळ्या-मेंढ्या बसवल्यानंतर मेंढपाळांना धान्य दिले जाते.

शेतीसाठी मेंढीचे खत उपयुक्त असल्याने शेतकरी उन्हाळ्यात मेंढ्या बसून जमीन सुपीक करण्यासाठी प्रयत्नशील असतात. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत असल्याने सावलीचा शोध घेत मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यांना दुपारी झाडांच्या सावलीत शोध घेऊन बसवतात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com