Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Water Crisis : नांदेडला पावसाअभावी प्रकल्प तळाला

Dam Water Level : नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर खरिपातील पेरण्यांची कामे आटोपली आहे. असे असलेतरी मोठा पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी नदी-नाल्यांना पाणी आले नाही.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जुले महिना अर्धा संपल्यानंतरही अद्याप मोठा पाऊस झाला नाही. परिणामी नदी-नाल्यांना पाणी आले नाही. परिणामी नांदेड पाटबंधारे विभागातर्गत येणाऱ्या १०४ प्रकल्पात केवळ ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी व लघू प्रकल्प तळाला गेले आहेत. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर खरिपातील पेरण्यांची कामे आटोपली आहे. असे असलेतरी मोठा पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी नदी-नाल्यांना पाणी आले नाही. यामुळे जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्यासाठ्यात वाढ झाली नाही. दरम्यान शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या केवळ १९.३ दशलक्ष घनमीटरनुसार केवळ २३.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ७३.५५ दलघमीनुसार ५३.२२ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ५१.१० दलघमीनुसार ३६.७५ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधार्‍यात ०.०१ दलघमीनुसार ०.१३ टक्के पाणीसाठा आहे. ८० लघू प्रकल्पात ५८.८३ दलघमीनुसार ३४.०४ टक्के पाणीसाठा आहे.

नऊ उच्च पातळी बंधार्‍यात ३७.६८ दलघमीनुसार १९.८५ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात २४०.३० दशलक्ष घनमीटरनुसार ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४२०.१६ दलघमीनुसार ४९.८९ टक्के पाणीसाठा आहे.

तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात १९.६८ दलघमीनुसार २४.३५ टक्के पाणीसाठा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ५३४.८८ दलघमीनुसार ५५.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळ विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी १९.१३ २३.६८

मानार ७३.५५ ५३.२२

मध्यम प्रकल्प (९) ५१.१० ३६.७५

लघू प्रकल्प (८०) ५८.८३ ३४.०४

उच्चपातळी

बंधारे (९) ३७.६८ १९.८५

एकूण प्रकल्प १०४ २४०.३० ३३.००

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ४२०.१६ ५१.८९

सिद्धेश्‍वर. १९.६८ २४.४८

इसापूर ५३४.८८ ५५.४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam Water Release : 'उजनी'तून 'भीमे'त २० हजाराचा विसर्ग

Plastic Flower Ban : प्लॅस्टिक फूल विक्रीवर शासनाने बंदी घालावी

Urea Shortage : युरीया बनला विक्रेत्यांचीही डोकेदुखी

Fertilizer Smuggling : गोंदियातून मध्य प्रदेशात खतांची तस्करी उघड

Guava Auction : हिमायत बागेतील अतिक्रमण काढल्याच्या परिणामी केंद्राच्या महसुलात वाढ

SCROLL FOR NEXT