Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Latur Kharif Sowing Update : पाच जिल्ह्यांत केवळ १७ हजार ४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी

Kharif Sowing : कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात ३० जून अखेरपर्यंत सरासरी २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १७,४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Latur News : कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात ३० जून अखेरपर्यंत सरासरी २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १७,४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यातील हवामान गत आठवडाभरात उष्ण व कोरडे होते. लातूर कृषी विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर आहे. ३० जून अखेरपर्यंत विभागात ४८.२४ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

३० जून अखेरच्या सरासरीच्या तुलनेत तो ३३ टक्के असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६ टक्के इतका आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अजून विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला गती दिलेली दिसत नाही.

लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या काही शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली आहे.

...अशी आहे पीकनिहाय पेरणी स्थिती

- खरीप ज्वारी : या पिकाचे क्षेत्र ९४ हजार १७८ हेक्टर असून अजून ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरवात केलेली नाही.

- खरीप बाजरी : सरासरी ११८४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात बाजरीची ही पेरणी झालेली नाही.

मका : मका पिकाचे सरासरी क्षेत्र ३० हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी झालेली नाही.

मूग : पिकाची सरासरी क्षेत्र ९६ हजार ८४१ हेक्टर असून ३१९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.

उडीद : उडीदाची सरासरी क्षेत्र ९८,९२७ हेक्टर असून २६७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

तूर : पिकाची सरासरी क्षेत्र तीन लाख ४९ हजार २५३ हेक्टर असून १३८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे.

सोयाबीन : सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून ७३१७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

कपाशी : पिकाचे सरासरी क्षेत्र ४८५,०८८ हेक्टर असून प्रत्यक्षात ८११४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्हा- सरासरी क्षेत्र - प्रत्यक्ष पेरणी

लातूर - ५ लाख ९९ हजार ४५६- ६५१

धाराशिव- लाख ४ हजार ७३५- ०

नांदेड- ७ लाख ६६ हजार ८०९- २९०

परभणी- ५ लाख ३४ हजार ९०० - ६८०२

हिंगोली - ३ लाख ६१ हजार ५४ - ९७२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Wildlife: राज्यात दोन नवीन अभयारण्ये; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

Cotton Rate: पुढील २ महिने कापसाचे भाव टिकणार? अमेरिकेच्या निर्यातीचा बाजाराला आधार

Jal Jeevan Mission : पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांवरून सीईओंचा संताप

Agricultural Loans: पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीककर्ज द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Drought Management : टंचाईवर मात करण्यासाठी 'पाणी, धान्य आणि चारा' नियोजनाची गरज

SCROLL FOR NEXT