Video
Cotton Rate: पुढील २ महिने कापसाचे भाव टिकणार? अमेरिकेच्या निर्यातीचा बाजाराला आधार
Cotton Demand:कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. दिवाळीच्या काळात बाजारातील आवक वाढल्याने कापसाच्या दरावर काही काळ दबाव येऊ शकतो. मात्र, उत्पादनातील घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पॉलिस्टरच्या वाढलेल्या किमती यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळत असल्याचे बाजार विश्लेषणातून दिसते.
