Kharif Sowing : पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको

Kharif Crop Sowing : जिल्ह्यात बियाणे व रासायनिक खतांचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. मात्र पाऊस पडण्यास उशीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on: 
Updated on: 

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season : नाशिक ः जिल्ह्यात बियाणे (Seeds) व रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) साठा पुरेशा प्रमाणात आहे. मात्र पाऊस पडण्यास उशीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले.
२५ जून ते १ जुलै या कालावधीतील कृषी संजिवनी सप्ताहाची सुरुवात विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ढगा (ता. नाशिक) येथून करण्यात आली.

या वेळी शिरसाठ बोलत होते. कार्यक्रमास नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव खांडबहाले, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, दत्तूभाऊ ढगे, प्रगतिशील शेतकरी, महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. पहिला दिवस कृषि पीक तंत्रज्ञान प्रसार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

शिरसाठ म्हणाले, की बियाणे व रासायनिक खते किंवा कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी विक्रेत्यांकडून विहित नमुन्यातील पक्की पावती घेतल्याशिवाय कृषी निविष्ठा खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

त्यामुळे फसवणूक टाळून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. यासह कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.  

Kharif Sowing
Kharif Sowing : पुरेसा पाऊस, ओल झाल्याशिवाय पेरणी नको

वाघ म्हणाले, की कृषी विषयक नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषी विद्यापीठामार्फत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी केले. तसेच  कृषी अधिकारी विजय चौधरी यांनी कृषक अॅपविषयी माहिती दिली.

Kharif Sowing
Kharif Sowing : रुंद वरंबा- सरी पद्धतीने पेरणी

जिल्हा परिषद सेस योजना तसेच बायोगॅस विकास योजनेबाबतची माहिती कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र शिरोडे यांनी दिली.

रोहयोअंतर्गत बांधावरील फळबाग लागवड, नाडेप वर्मी कंपोष्ट, रेशीम उत्पादन आदी बाबतची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन कृषी विस्तार अधिकारी विजय शंकपाळ यांनी केले.

कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने  महिला शेतकऱ्यांना विविध फळरोपे, नागली बियाण्याचे वाटप करण्यात आले. कृषी सहायक राहुल शिंदे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी भामरे, मंडल कृषी अधिकारी मधुकर जाधव, कृषी पर्यवेक्षक संजय सानप, रवी अहिरे, कृषी सहायक राहुल शिंदे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com