Drought Action Plan 2026 : नाशिक दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीस्रोतांचे सर्वेक्षण, गरजेनुसार विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन तातडीने करावे. नागरिकांना अन्नधान्याचे वितरण वेळेत करून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिले..येवला संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. .Kharif Crop Insurance: खरिपातील पीकविमा भरपाईसाठी राज्यात किती कापणी प्रयोग होतील ?.भुजबळ म्हणाले की,उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची स्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा. पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी, विंधनविहिरी आणि अन्य स्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक मदत वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतिमान ठेवावी. पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. वनक्षेत्रातील पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासावी. आवश्यक परवानग्या घेऊन मेंढपाळ आणि चराऊ जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या..Tur Crop Flowering: खानदेशात पूर्वहंगामी तूर पीक आलेय फुलोऱ्यावर.येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जलजीवन अभियानांतर्गत सुरू असलेली सुधारणेची कामे आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, असे निर्देश भुजबळ यांनी दिले..येवला व निफाड तालुक्यांतील शेती आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचाही आढावा घेण्यात आला. नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, असे त्यांनी सांगितले. लासलगाव येथील घरकुल योजना, शहरातील कचरा डेपोसाठी पर्यायी जागा, पिंपळस-येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, लासलगाव-विंचूर चौपदरी रस्ता आणि खेडलेझुंगे येथील काँक्रीट रस्त्याच्या कामांची माहिती घेण्यात आली. राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शीव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. प्रलंबित बाबींची पूर्तता करून विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागांनी पाठपुरावा करावा,असे निर्देश भुजबळ यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.