Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातील १६ टक्के क्षेत्रच विमा संरक्षित

Agriculture Insurance : जिल्ह्यातील ६ लाख ८१ हजार हेक्टरपैकी केवळ १ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनीच विमा काढला असून त्याचे प्रमाण सरासरी १६.८९ टक्के इतके आहे.

Team Agrowon

Amravati News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जिल्ह्यातील ६ लाख ८१ हजार हेक्टरपैकी केवळ १ लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनीच विमा काढला असून त्याचे प्रमाण सरासरी १६.८९ टक्के इतके आहे. विमा काढण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तथापि, नैसर्गिक आपत्तीनंतर परतावा मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत व परताव्याचा अनुभव बघता या योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे. यंदा मॉन्सूनच्या विलंबाने पेरण्या लांबल्या असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्यांची टक्केवारी अधिक आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८१ हजार ७७७ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून आतापर्यंत ५ लाख १ हजार ६१० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. त्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र मात्र झालेले नाही. आतापर्यंत विमा संरक्षणासाठी १ लाख ४१ हजार ४८९ अर्जांची नोंदणी झाली. यामध्ये १५७६ कर्जदार व १ लाख ३९ हजार ९१३ बिगर कर्जदारांचा समावेश आहे. त्यामुळे १ लाख १९ हजार ८१३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले असून त्याचे प्रमाण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ १६.८९ टक्के आहे.

विमा काढण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत असून त्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी ७५ वर पोहोचली असताना शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेतील सहभाग वाढविलेला नाही. देशभरातील पेरणीची एकंदरीत स्थिती बघता या योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकूण पेरणी क्षेत्र ६,८१,७७७

आतापर्यंत झालेली पेरणी ५,०१,६१०

विमा संरक्षित क्षेत्र १,१९,८१३

टक्केवारी १६.८९

कर्जदार संख्या १५७६

बिगर कर्जदार १,३९,९१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT