Land Cases : ‘भोगवटादार वर्ग-२’ ची प्रकरणे निकाली काढण्यास मुदतवाढ

Land Cases Class 2 : सवलतीच्या दराची रक्कम भरण्यासाठी अर्जदारांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
Land Cases Class 2
Land Cases Class 2 agrowon
Published on
Updated on

Kolhapur Collector : भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये सवलतीच्या दरामध्ये रूपांतर करण्याची ७ मार्च २०२४ पर्यंत आलेल्या प्रकरणांचा निपटारा तीन महिन्यांत ७ जूनपर्यंत करण्याचे राज्य शासनाचेच आदेश आहेत; परंतु सर्व यंत्रणा लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने या प्रकरणांवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता ७ सप्टेंबरपर्यंत शासनाकडून मुदतवाढ दिली आहे.

याबाबतचे आदेश महसूल विभागाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणांच्या सवलतीच्या दराची रक्कम भरण्यासाठी अर्जदारांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याची अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी सवलतीचा दर आकारण्यासाठी मार्च २०१९ ला शासन निर्णय होऊन तीन वर्षांची मुदत दिली होती. ही मुदत मार्च २०२२ ला संपली. त्यानंतर शासनाने पुन्हा मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत ७ मार्चला संपली.

Land Cases Class 2
Land Information Map : जमिनीची माहिती देणारा नकाशा तयार

त्यानंतर शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली नाही. तसेच या कालावधीत प्राप्त झालेली प्रकरणे तीन महिन्यांत म्हणजे ७ जूनपर्यंत निकाली काढण्याचे आदेश दिले होते; परंतु या काळात लोकसभा निवडणुकीचे कामकाज असल्याने त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त होती.

त्यामुळे या काळात हे काम होऊ शकले नसल्याने शासनाने या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com