Onion Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Production : पावसामुळे खामगावात कांद्याचे उत्पादन घटले

Farmer Issue : यंदा अवकाळी व पूर्वमोसमी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघालेला नाही.

Team Agrowon

Buldhana News : यंदा अवकाळी व पूर्वमोसमी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा निघालेला नाही. कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, अशी परिस्थिती आहे.

खामगाव तालुक्यात उन्हाळ कांद्याची मोठ्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. कांदा हे पीक चार महिन्यांचे असून चांगली मिळकत त्यातून होत असते. शेतकरी जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांदा पिकाची लागवड करून एप्रिल ते मेमध्ये कांदा काढण्यास सुरवात करीत असतात.

या भागात कांद्याची एकरी उत्पादकता ८० ते १०० क्विंटलदरम्यान राहते. परंतु या वर्षी अवकाळी पाऊस आल्याने कांदा पिकाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली आहे. जमिनीमध्येच कांदा सडल्याने व रोग आल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीही ठोस न आल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असून यावर्षी खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.कांद्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आला आहे. शेतकऱ्यांना एका एकरात जवळपास ८० ते १०० क्विंटल कांदा झाल्यास चांगले उत्पन्न येऊन मोबदला मिळतो. परंतु कांद्याचे नुकसान झाले.

कांदा पीक उत्पादन खर्च (एकरी, रुपये)

मोगडणी ७००

वखरणी ७००

लागवड १० हजार

फवारणी ५ हजार

खते ५ हजार

बियाणे १ हजार

कांदा काढणी १० हजार

निंदणी २ हजार

एकूण ३५ हजार

पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा जमिनीमध्ये सडला. तसेच अज्ञात रोगाने कांदा पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट आली आहे. होणारे उत्पन्न व लागलेल्या खर्चाचा हिशेब केला तर लावलेले पैसे सुद्धा निघताना दिसत नाहीत. यामुळे शासनाने मदत करावी.
महादेव दुतोंडे, कांदा उत्पादक, बोरी अडगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT