Onion Storage : अनेक भागात कांद्याची टिकवण क्षमता कमी

Onion Preservation Capacity : तीव्र उष्णता, पाणी कमी पडल्याचा परिणाम
onion storage
onion storageagrowon

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Onion Shelf Life : नगर ः राज्यातील बहुतांश भागात यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. मार्चपासून अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्याचा थेट परिणाम गावरान कांद्याच्या टिकवण क्षमतेवर झाल्याचे दिसून येत आहे. साधारण मार्च-एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा महिनाभरातच सडू लागला आहे. यंदा पाणी टंचाईमुळे ज्या भागात कांद्याला पाणी कमी पडले, तेथे हे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगतात.

राज्यातील नगर, नाशिक, सोलापूर, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातुर, परभणी, जालना, हिंगोली यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत कांद्याचे बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन वर्षांपासून कांदा निर्यातबंदी, अधिकचे उत्पादन यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक त्रस्त आहेत. मात्र नगदी पीक म्हणून अलीकडे अधिक पसंती असलेल्या कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. यंदा राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती असूनही साधारणपणे राज्यात यंदाच्या वर्षात सरासरी सहा लाख ६० हजार ८७१ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

onion storage
Onion Storage By FPO : हमीभावाने कांदा खरेदीपूर्वीच ‘एफपीओं’ कडून कांद्याची साठेबाजी

त्यांपैकी रब्बी हंगामात चार लाख ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. हेक्टरी २० टन सरासरी कांदा उत्पादन गृहीत धरल्यास ८६ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. काही अभ्यासक पूर्वमोसमीमुळे यंदा कांदा उत्पादनात घट होऊन प्रतिहेक्टरी उत्पादन २० वरून १७ टनांवर येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कमी उत्पादन गृहीत धरल्यास ७३ लाख टन कांदा उत्पादित होईल. उन्हाळी गावरान कांद्याची साधारणपणे फेब्रुवारीपासून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काढणी झाली.

यंदा राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. कांदा लागवड केलेली असली तरी अगदी शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी पाणी कमी पडले. त्यात मार्चपासून अनेक भागात अधून-मधून पूर्वमोसमी पाऊस पडला. अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा अल्प प्रमाणात का होईना भिजला आहे. काढणी करून शेतकऱ्यांनी शेतातच काढणी करून कांदा काढून ठेवला. पावसासोबत उन्हाची तीव्रताही अधिक आहे. त्याचा परिणाम कांदा टिकवण क्षमतेवर झाला असून बहुतांश ठिकाणी कांदा सडू लागला आहे. शेतात टाकलेला, चाळीत ठेवलेला कांदा खराब होत आहे. साधारण चाळीस टक्क्यांपर्यंत कांद्यावर असा परिणाम झाल्याचे दिसत असून लवकर विक्री करावी लागत असल्याने आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे.


शेतातूनच थेट विक्री
गावरान कांदा काढल्यानंतर दरात वाढ होईपर्यंत चाळीत साठवून ठेवला जातो. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर मार्च-एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा दर वाढत नसल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यत ठेवला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. मार्च महिन्यात काढलेला कांदा काही शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवस शेतात ठेवला. उन्हाची तीव्रता, तापलेली जमीन आणि जेथे टंचाईमुळे पाणी कमी पडल्याचा परिणामाने कांदा जागेवरच सडू लागला आहे. राज्यात एकंदर विचार करता तीस ते चाळीस टक्के कांद्याची अशी स्थिती आहे. कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्याने जागेवरूनच (शेतात) अनेक शेतकरी कांदा विक्री करताना दिसत आहेत. त्याचा आर्थिक फटका बसत आहे.


यंदा उष्णता अधिक आहे. शेतात अथवा कांदा चाळीत टाकला तरी उष्णतेमुळे कांदा सडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत कांद्याचे टिकवण क्षमता कमी झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागेल असे दिसतेय.
- सोपानराव तांबे, कांदा उत्पादक शेतकरी, तांबेवाडी, ता. श्रीरामपूर, जि., नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com