KGS Sugar Mill: केजीएस साखर कारखान्याचे धुराडे पेटणार
Maharashtra Agriculture: पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील सहा वर्षांपासून बंद असलेला ‘केजीएस शुगर अँड इन्फ्रा कार्पोरेशन लिमिटेड’ साखर कारखाना नव्या मालकाच्या ताब्यात गेला आहे. लासलगावचे उद्योजक संजय होळकर यांनी ‘ग्रेनाँच इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून हा कारखाना खरेदी करत शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे.