Crop Loss Inspection: अतिवृष्टी, महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी
Farmers Relief: सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील पिकांचे अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठे नुकसान झाले असून, हे नुकसान केंद्रीय पथकाने मान्य केले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. नवीन पाटले यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथकाने शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या.