Onion Cultivaton Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवडीला वेग

Onion Planting in Khandesh : खानदेशात कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे. यातच पाऊस व इतर समस्यांमुळे यंदा लागवड कमी होणार असल्याचे चित्र आहे. कांदा लागवडीची कार्यवाही जळगावमधील जळगाव, यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर यांसह धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा भागांत सुरू आहे.

सततच्या पावसासह दर अनिश्‍चित असल्याने यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात होते. मागील हंगामात उन्हाळ कांद्याची खानदेशात सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मागील उन्हाळ हंगामात लागवडदेखील डिसेंबर व जानेवारीत झाली होती. खरिपात मात्र ऑगस्टमध्येही लागवड झाली. तसेच सध्याही लागवड होत आहे.

ही लागवड सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव या भागांत लागवड कमी होईल, असा अंदाज होता. कारण या भागात पाऊसमान अधिक व सतत होते. जून महिन्यात दरात सुधारणा झाली. परंतु लागलीच दरस्थिती अस्थिर होती.

सध्या लागवड सुरू असून, सर्वत्र लागवडीला वेग आला आहे. परंतु अनेक भागात मजूरटंचाई असून, लागवडीसंबंधी कार्यवाही रखडत सुरू आहे. लागवडीसाठी अनेक शेतकरी बाहेर गावांतून वाहतूक भाडे खर्च करून मजूर आणत आहेत.

काही गावांत कांदा लागवड करणारे कुशल मजूरदेखील आहेत. या मजुरांच्या गटांकडून अनेक शेतकरी लागवड करून घेत आहेत. लागवडीसाठी १८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरी दिली जात आहे. काही शेतकरी सलग सात ते आठ तास लागवडीसंबंधी अधिक मजुरी देऊ करीत आहेत.

आपापल्या रोपवाटिकांमधील रोपांची पुनर्लागवड

कांदा रोपांचे दरही अधिक झाले आहेत. तसेच रोपांबाबतचे परावलंबित्व लागवडीच्या कार्यवाहीत अडसर ठरते. यामुळे कमाल कांदा उत्पादकांनी आपापल्या रोपवाटिका जून व ऑगस्टमध्ये तयार केल्या होत्या. या रोपवाटिकांतील रोपे आता पुनर्लागवडीसाठी तयार झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी रोपांची लागवड केल्यानंतर शिल्लक रोपांची विक्रीही केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT