Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवड जोरात

Onion Crop : खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये दर वर्षी कांदालागवड होते.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सर्वत्र सध्या कांदालागवड जोरात सुरू असून, लागवडीचा हा हंगाम मध्यावर आला आहे. दर वर्षीच्या तुलनेत मात्र या वर्षी कांदा रोपांचे भाव काहीसे तेजीत असल्याचे दिसून आले आहे.

खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये दर वर्षी कांदालागवड होते. आताही लेट खरीप कांदालागवड सुरू झाली असून, अडावद, लासूर, गणपूर, वर्डी, माचला, मंगरूळ, किनगाव, नायगाव, चिंचोली, गांधली, दहिवद, पीळोदे, साकरे, पिंपळे, धरणगाव, चाळीसगाव आणि एरंडोल तालुक्यांतील काही गावात कांदालागवड केली जाते.

Onion Cultivation
Onion Cultivation : ट्रॅक्टरआधारित स्वयंचलित यंत्राद्वारे कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक

विखरण, भामपूर, वैजाली, जुनमोहिदे, पिंपळनेर, शहादा, सोनवद, फोफादे, करले, परसोडे, निजामपूर, जैताणे, गोताने, देवी, रेवाडी, तामथरे, खोरी, टिटाणे, चिमठाणे, कढरे, छडवेल, इंदवे, मेहरगाव, बोरीस, वडणे, बुरझड, कापडणे, नगाव, देवभाने आदी भागात लेट खरीप कांद्याची लागवड केली जाते.

Onion Cultivation
Onion Market : कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा

ही कांदालागवड सध्या जोरात सुरू असून, मधल्या काळात सलग पाऊस सुरू राहिल्याने रोपवाटिकेतील कांद्याचे रोप बऱ्याचअंशी खराब झाल्याने एक हजार ते बाराशे रुपयांना मिळणारी रोपांची सरी आता अडीच ते तीन हजार रुपयांना मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप विकून कांदालागवड न करण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी दहा दिवसांपूर्वी पुन्हा कांद्याचे रोप टाकले आहे.

येत्या ५० ते ५५ दिवसांत लागवड करण्यात येईल. या वर्षीचा हंगाम मात्र काहीसा उशीर झाला असून, अजूनही महिनाभर ही लागवड चालेल. कांदालागवडीच्या मजुरीच्या दरातही काही ठिकाणी वाढ झाल्याचे दिसून आले असून, काही ठिकाणी मजुरी २५० रुपये, तर काही ठिकाणी तीनशे रुपये झाली आहे. कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे ३५ मजूर लागत असल्याने काही शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धतीने ट्रॅक्टर व बैलजोडीवरील मशिनच्या सहाय्याने कांद्याची पेरणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com