Onion Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : सोलापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड

Onion Production : मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील लघू-मध्यम प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढली आहे. मागच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यावर्षी ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून अजूनही लागवड सुरूच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यांमध्ये यंदा कांदा लागवड सर्वाधिक झाला आहे. हेक्टरी १४ मे.टन कांदा उत्पादन होते. यंदा सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ६० हजार मे.टन कांदा उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यातील कांदा साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर आणि सर्वाधिक कांदा डिसेंबर व जानेवारीत बाजारात येतो. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात सर्वाधिक कांदा लागवड झाला आहे. तीन महिन्यानंतर तो कांदा बाजारात विक्रीसाठी येईल.

गतवर्षी जिल्ह्यातील कांदा बाजारात आल्यानंतर मार्चमध्ये निर्यातबंदी झाली आणि कांद्याचे दर गडगडले. निर्यातबंदीपूर्वी कांद्याला सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत होता. पण, भाव कमी झाल्यावर हजारो शेतकऱ्यांनी बंगळुर बाजारात कांदा विकला. यंदा निर्यातबंदी होणार नाही या आशेने जिल्ह्यात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त कांदा लागवड झाला आहे.

सध्या कांद्याला ३ ते ५ हजाराचा दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल तीन ते पाच हजार रुपयांचा दर मिळत आहे. दररोज बाजार समितीत ८० ते ११० गाड्या कांद्याची आवक होत आहे. कर्नाटकातून आता पांढरा कांदा विक्रीसाठी येत असून ऑक्टोबरमध्ये नियमित कांदा विक्रीसाठी येईल. सोलापूर जिल्ह्यातील कांदा देखील ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विक्रीसाठी येतो. यावर्षी कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT