Onion Cultivation : पावसाने उघडिपीमुळे कांदा लागवडीला गती

Rain Update : यंदा खरीप लाल कांदा उत्पादक पट्ट्यात पावसामुळे हंगाम काहीसा अस्थिर झाला. अनेक भागांत सुरुवातीला पाऊस नव्हता.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यंदा खरीप लाल कांदा उत्पादक पट्ट्यात पावसामुळे हंगाम काहीसा अस्थिर झाला. अनेक भागांत सुरुवातीला पाऊस नव्हता. तर नंतर झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. तर काही भागांत अद्याप पाणीटंचाई आहे.

अशा परिस्थितीत कांदा लागवडीला गती आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार सोमवारअखेर (ता. २६) जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या आहेत. लागवडी सुरू असल्याने त्यात वाढ होणार आहे.

खरीप लाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची दरवर्षी आघाडी असते. सरासरी २० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. मात्र सुरुवातीला काही ठिकाणी पावसाचे कमी प्रमाण तर काही ठिकाणी अतिवृष्टी यामुळे लागवडीचे नियोजन कोलमडले. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा रोपांचे नियोजन करून लागवडी केल्या आहेत.

Onion Cultivation
Onion Cultivation : सततच्या पावसामुळे कांदा लागवड रखडली

जुलैअखेर नंतर टप्प्याटप्प्याने लागवडी सुरू झाल्या. सुरुवातीला मालेगाव तालुक्यात लागवडीचा टक्का वाढल्याचे दिसून आले. नंतर पाऊस होताच चांदवडमधील शेतकऱ्यांनी लागवडीत आघाडी घेतली.

जिल्ह्यातील कांदा लागवडीची ठळक स्थिती

सुरुवातीच्या टप्प्यात मालेगाव तालुक्यात लागवडीला सुरुवात

पाऊस झाल्यानंतर सिंचनाची सुविधा होताच चांदवड तालुक्यात सर्वाधिक लागवडी

येवला तालुक्यात रोपवाटिका सर्वाधिक; मात्र विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने लागवडीचा टक्का कमी, मुगाची शेते खाली होताच लागवडींसाठी टक्का वाढता

सिन्नर, देवळा तालुक्यांत पुढील आठवड्यानंतर रोपे उपलब्ध होताच लागवडी वाढणार

नांदगाव तालुक्यात लागवडीचा टक्का कमी

Onion Cultivation
Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवडीस वेग

तालुकानिहाय लागवड स्थिती (हेक्टरमध्ये) (ता. २६ ऑगस्टअखेर)

निफाड ४२

सिन्नर ३९३.७

येवला २,६१२

चांदवड ४,४६८

मालेगाव ४,११०

सटाणा १८०

नांदगाव ३५

देवळा ८०१

एकूण १२,६४२

(संदर्भ : कृषी विभाग-जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय)

खरीप कांद्याची तीस ते पस्तीस टक्के लागवड उरकली आहे. मात्र विहिरींना पाणी नसल्यामुळे लागवडीवर परिणाम होऊन हे क्षेत्र रांगडा कांद्यामध्ये रूपांतरित होईल. तथापि सरासरी पाऊस असला तरीसुद्धा पाणी पातळीत वाढ नाही त्यामुळे तुर्त तरी चित्र स्पष्ट नाही.
- अशोक कुळधर, कांदा उत्पादक व माजी तालुका कृषी अधिकारी, सायगाव, ता. येवला
दरवर्षी ऑगस्टअखेर खरीप कांदा लागवड पूर्ण होऊन जायची पण यंदा अद्याप सुरुवात देखील नाही. मागील वर्षी दुष्काळ असल्याने खरीप कांदा देखील झाला नाही. यावर्षी सततच्या पावसामुळे लागवड करता येत नाही. पावसाचा आनंद आहे पण जर पाऊस उघडलाच नाही तर यंदाचा हंगाम देखील रोपे खराब झाल्याने नुकसान होऊ शकते.
- जयदीप भदाणे, कांदा उत्पादक, कापशी, ता. देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com