Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीतही कांदा लागवड

Onion Production : नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झाले असले तरी कांदा लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झाले असले तरी कांदा लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे काही भागात पाणी उपलब्ध झाल्याने कांद्याचे क्षेत्र वाढीला मदत होत आहे.

यंदाही दोन हेक्टरच्या जवळपास कांदा लागवड होण्याचा अंदाज असून, आतापर्यंत १ लाख ७० हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. यंदा पुरेसा दर नाही, नैसर्गिक वातावरणामुळे नुकसान होत असूनही शेतकऱ्यांचा कल कांदा उत्पादनाकडेच आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षात कांदा उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. उसाचा पट्टा असलेल्या भागातील शेतकऱ्यांचाही कांदा उत्पादनाकडे कल दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून अडीच लाख हेक्टरपर्यंत लागवड झाल्याचे पाहायला मिळाले होते.

यंदा पुरेसा पाऊस नसल्याने खरिपातील पिके वाया गेली. रब्बीतही अनेक गावांत टंचाईचा मोठा फटका बसला. कोरडवाहू भागात ज्वारी, हरभरा घेण्याला प्राधान्य दिले गेले आहे.

बदलत्या हवामानाचा फटका

जिल्ह्यात यंदा सातत्याने ढगाळ, पावसाळी हवामान तयार होत आहे. अधून-मधून धुकेही पडत आहेत. त्याचा कांदा पिकांवर परिणाम होत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व त्यानंतर दोन दिवस सातत्याने पडलेल्या धुक्यामुळे कांदा रोपांचे तसेच लागवड केलेल्या कांदा पिकाला फटका बसला. सततच्या बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका बसत असून, यंदा करपा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करण्याला प्राधान्य द्यावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT