Onion Cultivation : खानदेशात उन्हाळ कांद्याची लागवड सुरूच

Onion Farming : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांद्याची लागवड सुरूच आहे. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांद्याची लागवड सुरूच आहे. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लागवड मागील १५ ते २० दिवसांपासून सुरूच आहे. यंदा लागवड कमी होईल, असे संकेत सुरुवातीपासून होते. कारण पाऊसमान कमी राहिले आहे. धुळे जिल्हा उन्हाळ कांदा लागवडीत आघाडीवर असतो. परंतु यंदा धुळ्यातील लागवड कमी झाली आहे. कमी पावसामुळे धुळ्यातील साक्री, धुळे भागात लागवडीत मोठी घट झाली आहे.

अनेकांनी क्षेत्र कमी केले आहे. कांद्याचे दर वधारले त्या वेळेस शेतकऱ्यांकडे कांदा विक्रीसाठी नव्हता. शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढणी सुरू होताच दर कमी झाले. याचाही परिणाम कांदा लागवडीवर झाला आहे. खानदेशात उन्हाळ कांद्याची लागवड १२ ते १३ हजार हेक्टरवर केली जाते. परंतु यंदा क्षेत्र सुमारे १० हजार ५०० ते साडेनऊ हजार हेक्टर एवढेच राहील, असे संकेत आहेत.

Onion Cultivation
Onion Cultivation : कांदा पीक जगविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ

एकट्या धुळ्यातील लागवड पाच हजार हेक्टर एवढी असते. परंतु धुळ्यातील लागवडीला मोठा फटका बसत आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, धरणगाव या भागांत लागवड कमी झाल्याचे चित्र आहे. परंतु चोपडा, यावल या भागातील लागवड स्थिर आहे. नंदुरबारात शहादा, नवापूर, नंदुरबार तालुक्यात कांदा पीक आहे. तेथेही लागवड सुरू आहे.

उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी शेतकरी लाल कांदा वाणास पसंती देत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी करार शेतीअंतर्गत पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. पांढऱ्या कांद्याची लागवड धुळे, जळगाव व नंदुरबारातही झाली आहे. सध्या लेट रब्बी कांद्याची लागवड सुरू आहे. यासाठी शेतकरी कमी कालावधीच्या वाणांना पसंती देत आहेत. कांदा लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातच रोपवाटिका तयार केल्या होत्या.

Onion Cultivation
Onion Cultivation : मल्चिंग पेपरवर कांदा लागवड

या रोपवाटिकांतील रोपांची पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांत पुनर्लागवड केली जात आहे. लागवडीनंतर शिल्लक किंवा उरलेल्या रोपांची शेतकरी विक्री करून बियाण्यावरील खर्च काढून घेत आहेत. कांदा लागवडीसाठी यंदा एकरी साडेतीन हजार रुपये मजुरी येत आहे. ही मजुरी यंदा सुमारे तीन टक्के वाढली आहे.

काही गावांत दुष्काळी स्थिती असल्याने मजुरी स्थिर आहे. कमाल शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करून लागवड करून घेत आहेत. तर काहींनी गादीवाफा पद्धतीने ठिबकच्या माध्यमातून सिंचन करून लागवड केली आहे. एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल सिंचनासाठी आहेत.

चोपड्यातील अडावद आघाडीवर

जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे पाच हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. त्यात चोपडा तालुक्यातील अडावद व परिसरात सर्वाधिक कांदा लागवड आहे. कांद्यासाठी अडावदचा बाजार व अडावद शिवार सुरुवातीपासून प्रसिद्ध आहे. या भागात जलसाठेही बऱ्यापैकी असल्याने लागवडीला अडथळा आलेला नाही, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com