Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे एक हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Paddy Damage : मागील पंधरा दिवसात परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा दिला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : मागील पंधरा दिवसात परतीच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा दिला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे. जिल्ह्यात १००० शेतकऱ्यांचे सुमारे १२१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पावसामुळे कापलेली भात रोपे भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

यंदा ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. चार महिन्यांत भातशेतीला पूरक वातावरण होते. त्यामुळे भात उत्पादन चांगले राहील अशी शक्यता होती. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली आणि बळीराजाला फटका बसला.

पावसाचा प्रभाव अजूनही सुरूच आहे. त्यामुळे भात कापणीचे वेळापत्रक बिघडले आहे. शेतकऱ्यांचे उभे असलेले भात पीक आडवी झाली आहेत. काहींनी पंचनाम्यांची वाट न पाहताच भात झोडून घेतले.

अनेक ठिकाणी आडवे झालेले भाताच्या लोंब्या वाया गेल्या आहेत. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.

तालुकानिहाय झालेले नुकसान

मंडणगड ः ४४.११ हेक्टर, दापोली ६.१० हेक्टर, खेड ११.८, चिपळूण २७.२८, गुहागर ६.८७, संगमेश्वर ३.३२, रत्नागिरी ६.९१, लांजा ७.२०, राजापूर ८.४५ हेक्टर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT