Cotton Crop Damage : मालेगाव तालुक्यात कपाशीचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : कृषी विभागाच्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ५३५० हेक्टर क्षेत्रावर पावसाने कापूस पिकांचे १०० गावांत नुकसान आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा तडाखा मका, सोयाबीन, कांद्यासह कापसाला बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान मालेगावातील माळमाथा परिसरातील कापूस उत्पादक पट्ट्यात आहे. सततच्या पावसामुळे कापूस काळवंडला असून ७ हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित असल्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ५३५० हेक्टर क्षेत्रावर पावसाने कापूस पिकांचे १०० गावांत नुकसान आहे. मात्र गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे पुन्हा या नुकसानीत वाढ झाली असून हे नुकसान ७,००० हेक्टरवर जाण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : नुकसानीचे पंचनामे न केल्यास मतदानावर बहिष्कार

पांढरे सोने काळवंडले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान आहे. माळमाथा व काटवन परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाऊस अडचणीचा ठरला आहे. अनेक ठिकाणी कापूस पीक कोलमडून पडले आहे.

सप्टेंबरपासून होत असलेल्या पावसामुळे पिकावर करपा आला आहे. तर नवीन बोंडे खराब झाल्याने कापूस उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी कापूस वेचणीला येत असताना शिवारात चिखल असल्याने कामे खोळंबले आहेत.

अनेक ठिकाणी कापूस पिकाची वाढ खुंटल्याने वेचण्याची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. सततचे साचणारे पाणी, वादळ वाऱ्यासह पाऊस व अल्प सूर्यप्रकाश यामुळे कापसाला हा फटका बसला आहे. झोडगे, सायने, करंजगव्हाण, कळवाडी, डोंगराळे, निमगाव मंडळात मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

Crop Damage
Onion Crop Damage : पुरंदरमध्ये पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

दृष्टिक्षेपात नुकसान :

कापूस फुटण्याच्या अवस्थेत वारा व पावसामुळे फांद्या तुटून पडल्या

कडक उन्हामुळे कैऱ्यांमधून पाऊस कापूस बाहेर पडला मात्र चिखल्यात भिजल्याने नुकसान

सततच्या पावसामुळे कापूस लागवडी रोगग्रस्त होऊन पाने व बोंडे लाल पडली आहेत.

जमीन उपळल्याने झाडांचे मरचे प्रमाण वाढले आहे.

पावसाने कापूस पिकाला मोठा फटका आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामुळे पुढे कापूस वेचणी होणार नाही. जवळपास ५० टक्क्यांवर नुकसान आहे. फूलगळ झाल्याने उत्पादनावर परिणाम होईल. भविष्यात फरदड येणार आहे. यंदाचे वर्ष कापूस उत्पादकांसाठी अवघड आहे.
- सागर चव्हाण, कापूस उत्पादक, खडकी, ता. मालेगाव
मृग नक्षत्रपासून कापूस उत्पादक पट्ट्यात सतत पाऊस पडतो आहे. त्यामुळे कापसाने शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे अतोनात नुकसान आहे.
- रामकृष्ण जाधव, कापूस उत्पादक शेतकरी, पाडळदे, ता. मालेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com