Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : सांगली जिल्ह्याच्या भूजल पातळीत एक मीटरने घट

Water Level in Sangli : मॉन्सूनोत्तर चाचणीचा अहवाल तयार झाला असून यात पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी एक मीटरने भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या मॉन्सूनोत्तर चाचणीचा अहवाल तयार झाला असून यात पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी एक मीटरने भूजल पातळीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

पाच वर्षांतील सरासरी स्थिर भूजल पातळी ३.३४ मीटर होती. त्यात घट होऊन सप्टेंबरमधील स्थिर भूजल पातळी ४.३३ मीटरवर गेली आहे. मॉन्सूनोत्तर चाचणीतील या प्रकारच्या नोंदी चिंता वाढवणाऱ्या आहेत.

पाच वर्षांच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ च्या नोंदी पाहिल्या, तर सर्वाधिक घट खानापूर तालुक्यात दिसून येते. सरासरी ३.५९ मीटर इतकी असते. ती आता ५.९२ झाली आहे. त्याखालोखाल कडेगावला ४.१७ वरून ५.७३ मीटर, मिरज तालुक्यात २.५२ वरून ३.८२ मीटर, शिराळ्यात १.०१ वरून १.९७ मीटर, जतमध्ये ४.८० वरून ५.५७ मीटरपर्यंत खाली गेली आहे.

वाळवा तालुक्यात १.८८ वरून २.५९ मीटर, कवठेमहांकाळ ४.०६ वरून ४.६८ मीटर, तासगावमध्ये ५.१६ वरून ५.७३ मीटर, आटपाडीमध्ये ४.०९ वरून ४.६४ मीटर, पलूसमध्ये २.११ वरून २.६० मीटर पातळी खालावली आहे.

...अशा निवडतात विहिरी

जिल्ह्यातील ४८ पाणलोट क्षेत्रांत ८६ विहिरींची नोंद घेतली जाते. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यांत निवडलेल्या विहिरींतील पातळी तपासली जाते. निष्कर्ष जवळपास अचूक ठरावेत, यासाठी उपसा नसलेल्या या विहिरी असतात. २५ मीटरपर्यंत पाणी साठवून ठेवणारा खडक असतो. अर्थातच उथळ जलधर असलेल्या ठिकाणापर्यंत पाण्याचे मोजमाप करण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT