Agriculture Seed Fraud: बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणातील तपासाला चिखलदरा पोलिसांनी वेग दिला असून, बाधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करण्यात आला. .बियाण्याची उगवण न झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, संबंधित कंपनीविरुद्ध चिखलदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Soybean Seed Fraud : दारव्ह्यात सोयाबीन बियाणे कंपनीवर गुन्हा.तपासादरम्यान राजमा बेलसरे, लालू बेलसरे, प्रफ्फुल बेलसरे, मिथुन कोगे, सुखराम जामुनकर आणि मन्नू दहिकर या सहा शेतकऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. शेतातील पिकांची स्थिती, बियाण्याची उगवण आणि प्रत्यक्ष नुकसान याची पाहणी करून पंचनामा करण्यात आला..Fake Seed Complaints: नागपूर विभागात बोगस बियाण्यांच्या ३९४ तक्रारी.चिखलदरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश भूजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल कमलेश मुराई, जमादार संदीप फुंडदे, विवेक कोकरे तसेच कृषी अधिकारी आश्विन राठोड यांनी संयुक्तपणे शेतभेट देत तपास प्रक्रिया पूर्ण केली..बाधित शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याबरोबरच संबंधित कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलिस करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.