Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Vasantrao Naik Corporation : वसंतराव नाईक महामंडळामार्फत एक लाख रुपयांचे कर्ज

Loan Allocation : योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी
राबविण्यात येत आहे. महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि १ लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजना राबविण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना या राष्ट्रीयकृत बँका, राज्यस्तरीय बँकर्स समिती सदस्य असलेल्या बँकांसह इतर सहकारी बँका,
नागरी बँका, सर्व शेड्युल व मल्टीशेड्युल बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून २५ टक्के बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे. बँकांचा सहभाग ७५ टक्के असून व्याजदर बँकाच्या नियमाप्रमाणे लागू राहील. महामंडळाचा सहभाग २५ टक्के रकमेवर व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत महत्तम प्रकल्प मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतची आहे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न शहरी भागाकरिता १ लाख रुपये तर ग्रामीण भागाकरिता ९८ हजार रुपयापर्यंत असावे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमांसाठी, लघू, मध्यम उद्योगांचे उत्पादन व विक्रीसाठी व सेवा क्षेत्रांसाठी कर्ज वितरित
करण्यात येते. महत्तम कर्ज मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे कर्ज खात्याची आधार जोडणी असणे
अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम
(१२ टक्के मर्यादेत) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

गट कर्ज व्याज परतावा
गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख रुपयापर्यंत असून या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नोंदणीकृत गट असावा. गटातील
सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत. गटातील सदस्याचे वय १८ ते ४५ वर्षांपर्यंत असावे. गटातील लाभार्थीचे कर्ज खाते
आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. गटातील प्रमुख सदस्याने महामंडळाच्या महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे अनिवार्य
राहील. गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरकरिता असलेल्या कौटुंबिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत असावे.

‘योजनेसाठी येथे संपर्क करावा’
जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, तळमजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, येरवडा पुणे, दूरध्वनी क्र. (०२०) २९७०३०४९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT