Sachin hHolkar
Sachin hHolkarAgrowon

Vasantrao Naik Award : ‘शेती शोध आणि बोध’ला वसंतराव नाईक पुरस्कार

प्रौढ वाङ्‍मय गटातील शेती व शेतीविषयक पूरक व्यवस्था लेखनासाठी दिला जाणारा १ लाख रुपयांचा वसंतराव नाईक पुरस्कार लासलगाव (ता. निफाड) येथील कृषी अभ्यासक व लेखक सचिन होळकर यांच्या ‘शेती शोध आणि बोध’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
Published on

नाशिक : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या (Marathi Language Department) वतीने २०२१ वर्षासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रौढ वाङ्‍मय गटातील शेती व शेतीविषयक पूरक व्यवस्था लेखनासाठी दिला जाणारा १ लाख रुपयांचा वसंतराव नाईक पुरस्कार (Vasantrao Naik Award) लासलगाव (ता. निफाड) येथील कृषी अभ्यासक व लेखक सचिन होळकर यांच्या ‘शेती शोध आणि बोध’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे.

Sachin hHolkar
Agriculture Drone : ड्रोन प्रशिक्षणातून ‘कृषी’त मिळणार रोजगाराच्या संधी ः डॉ. गोरंटीवार

शेती क्षेत्रातील विविध समस्या व त्यांवरील उपाययोजना, शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीचा आढावा घेणारे ‘शेती शोध आणि बोध’ या सहाव्या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या पुस्तकात शेतकऱ्यांची कर्जमाफी, करार शेती, दुग्ध उत्पादन, द्राक्ष उत्पादन, शेतमजुरांच्या समस्या, यशोगाथांची सत्यता, आर्थिक चक्रव्यूहात अडकलेला शेतकरी, संकरित वाण, रासायनिक खते, कृषी कर्ज वितरण, सरकारी अनुदान, वनशेती, सेंद्रिय शेती आदी विषयांचा सखोल ऊहापोह केला आहे. होळकर हे सुवर्णपदकासह कृषी पदवीधारक आहेत. त्यांनी सात पुस्तकांचे लिखाण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com