FPC Capital : ‘एफपीसीं’ना भांडवल मिळण्याचा मार्ग मोकळा

Shikhar Bank : गोदाम उभारणी क्षेत्रात उतरलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोर भांडवलाची समस्या उभी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता राज्य शिखर बॅंकेने धाव घेतली आहे.
Warehouse
WarehouseAgrowon
Published on
Updated on

Pune News : गोदाम उभारणी क्षेत्रात उतरलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोर भांडवलाची समस्या उभी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता राज्य शिखर बॅंकेने धाव घेतली आहे. त्यामुळे कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सहभागी झाल्या आहेत. भव्य व्यावसायिक गोदामे उभारण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवले आहे. परंतु, कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर अनेक बॅंका दारात उभ्या करीत नसल्याचा अनुभव एफपीसींना आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प रखडले आहेत.

Warehouse
Central Warehouse Corporation : शेतीमाल साठवणुकीमध्ये केंद्रीय वखार महामंडळाचे योगदान

‘‘राज्यातील अनेक कंपन्या दोन हजार टन क्षमतेची भव्य गोदामे उभारीत आहेत. त्यासाठी ३ कोटी ३३ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. यात एक कोटीपर्यंत कर्ज उभारावे लागणार आहे. परंतु, कर्ज पुरवठ्यास बहुतेक बॅंका इच्छुक नाहीत. या समस्येचा स्मार्टने पाठपुरावा केल्या. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी अर्थात शिखर बॅंकेने मदतीचा हात दिला. कंपन्यांना भांडवल पुरवण्यासाठी शिखर बॅंकेने तातडीने करारदेखील केला,’’ अशी सूत्रांनी दिली.

स्मार्टमध्ये राज्यातील ७६७ एफपीसींना अनुदान मिळणार आहे. त्यापैकी किमान २०० कंपन्या गोदाम उभारणीस इच्छुक आहेत. शिखर बॅंकेकडून आता या कंपन्यांना पाच वर्षाकरीता एक कोटी रुपयांचे भांडवल पुरवले जाईल. या भांडवल पुरवठ्यावर ९ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी होणार असली तरी केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार आहे. केंद्राच्या कृषी पायाभूत निधीतून तीन टक्क्यांपर्यंत व्याज अनुदान मिळणार आहे. त्यामुळे एफपीसींना केवळ सहा टक्के व्याजात शिखर बॅंकेचे एक कोटी रुपयांचे भांडवल वापरण्यास मिळणार आहे.

भांडवल पुरवठ्यात तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून स्मार्ट व शिखर बॅंक यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला आहे. यावेळी ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर बोटे, बॅंकेचे उपमहाव्यवस्थापक मनोहरलाल आहुजा उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी उत्पादक कंपनीला आर्थिक अडचण असल्यास ‘स्मार्ट’मधील मदत कक्षातील अधिकारी कुलदीप जाधव (७४४७५१८४८४) यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Warehouse
Central Warehouse Corporation : केंद्रीय वखार महामंडळाचे नियोजन

गोदाम बांधणीसाठी असे येणार भांडवल

एकूण प्रकल्प खर्च : ३.३३ कोटी रुपये. (यात गोदाम, स्वच्छता व प्रतवारी केंद्राचा समावेश)

स्मार्टकडून मिळणारे अनुदान : २ कोटी रुपये

शेतकरी कंपन्यांचा स्वहिस्सा : ३३ लाख रुपये

बॅंकेद्वारे होणारी कर्ज उभारणी : एक कोटी रुपये

गोदाम उभारणीसाठी भांडवल मिळण्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांना अडचणी येत आहेत. मात्र, आता राज्य शिखर बॅंकेने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे कंपन्यांचे रखडलेले गोदाम प्रकल्प वेगाने आकार घेऊ शकतील.
डॉ. हेमंत वसेकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com