Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : नगर जिल्ह्यात कापसाची दीड लाख हेक्टर लागवड

Cotton Farming : नगर जिल्ह्यात कापसाचे सरासरी १ लाख २२ हजार ८६ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ लाख ५० हजार ५२५ हेक्टरवर (१२३ टक्के) लागवड झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात कापसाचे सरासरी १ लाख २२ हजार ८६ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ लाख ५० हजार ५२५ हेक्टरवर (१२३ टक्के) लागवड झाली आहे. यंदा अकोले तालुका वगळता सर्वच तालुक्यांत कापसाची लागवड आहे. मात्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेवगावसह नेवासा तालुक्यांत सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत खरिपाची ६ लाख ६६ हजार ७३० हेक्टरवर (११५ टक्के) पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा पावसाच्या लवकर झालेल्या आगमनाने खरिपाच्या पेरण्याही लवकर उरकल्या आहेत. शेवगावसह नेवासा, श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्यांतही कापसाचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी आहे. कापूस उत्पादनात शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करत असल्याचे दिसून येत आहे. जामखेड, कर्जत तालुक्यांत मात्र कापसाचे क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज आहे.

इतर खरीप पिकांत यंदा बाजरीचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत बाजरीची ७० हजार ५९५ (सरासरीच्या ४६.७६ टक्के) पेरणी झाली आहे. मुगाने सरासरी ओलांडली असून, त्याची ५० हजार ०५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडदाची सरासरीच्या दीड पट म्हणजे ६१ हजार १३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची दुपटीच्या जवळ म्हणजे १ लाख ५९ हजार ८०० हेक्टरवर, मक्याची ८० हजार हेक्टरवर, भाताची १४ हजार ३३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल या तेलबियांची पेरणी मात्र अल्प झाली आहे.

कापूस लागवड (कंसात सरासरी क्षेत्र, हेक्टर)

नगर : ११९६ (१,५८६), पारनेर : ११३ (२५), श्रीगोंदा : ६,२९६ (२,८२२), कर्जत : ५,१४५ (६९१४), जामखेड : २०१ (४,५४९), शेवगाव : ४५,४४५ (३८,७६६), पाथर्डी : २७,०९३ (२८,८०६), नेवासा : ३२,९६८ (१९,८३८), राहुरी : १८,६२३ (९,७७६), संगमनेर : ३०७३ (६२७), कोपरगाव : १३५० (३,०९३), श्रीरामपूर : ७,१८० (४,०८८), राहाता : १८४२ (११९३).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

Agriculture Scheme: शेतीसाठी यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५०% अनुदान; ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या

Cotton Crop Loss : अति पावसाने कपाशीचे पीक गेले हातातून

Jayakwadi Dam Water Release : ‘जायकवाडी’तून गोदावरीत ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

SCROLL FOR NEXT