Monsoon Session 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session 2024 : तिजोरीत खडखडाट थापांचा सुळसुळाट; अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांची बजेटवरून खोचक टीका

Opposition Protested 2024 : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तर शुक्रवारी (ता.२८) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शनिवारी छेडले. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. शनिवार (ता.२९) अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.  खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणादणून सोडला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सतेज पाटील, रविंद्र धंगेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदार उपस्थित होते.       

यादरम्यान अजित पवार यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावरून देखील विरोधकांनी सरकरावर जोरदार टीका केली होती. यानंतर आता अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र कामकाज सुरू होण्याच्या आधीच विरोधक चांगेलच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

यावेळी विरोधकांनी महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणत मविआच्या आमदारांनी महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल करत खोचक टीका केली आहे. तर लोकसभा निवडणुकीचा धसका, विधानसभेला मस्का, भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भुल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा अशा देखील घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. तर बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस महायुतीने पाडला. तर या घोषणा फक्त विधानसभा निवडणुकींच्यासाठी आटापीटा असल्याचे मविआच्या नेत्यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात विठ्ठल-रूक्मिणीची मुर्ती घेऊन सरकराचा निषेध व्यक्त केला. तर शिंदे गटाच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केल्याने ठाकरे गट-शिंदे गट आमने-सामने आले होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT