Pune News : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरूवारपासून (ता.२७) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सतेज पाटील, रविंद्र धंगेकर, अनिल देशमुख यांच्यासह मविआतील आमदार उपस्थित होते.
महायुती सरकारचे यंदाचे शेवटचे पावसाळी अधिवेशन असून शेतीप्रश्नासह विविध प्रश्नांवरून वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्यांच्या आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, ४० टक्के सरकार हाय हाय अशा घोषणांनी विरोधकांनी परिसर दणाणला सोडला.
यादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या समोर आले. यावेळी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी जोतदार घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आत आम्हीच आहोत असा इशारा दिला. यावेळी शिंदेंच्या बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भूसेंह इतर नेते उपस्थित होते.
ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडू. शेतकऱ्यांना महायुती सरकारने फसवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळालेले नाही किंवा कोणताच लाभ सरकारने दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी विरोधकांची मागणी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
याआधी सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच विरोधकांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे सांगताना वडेट्टीवार यांनी महायुती टीका केली होती.
या प्रश्नावरून सरकारची कोंडी?
शेतकरी कर्जमाफी, दूध दर, नीट परीक्षेतील गोंधळ, बोगस बियाणे, बेरोजगारी, शेतकरीला पीक कर्ज योजना, पुणे ड्रग्ज प्रकरण, पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण, पेपर फुटी यासह अनेक मुद्दे असतील