Assembly Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Assembly Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक ईव्हीएम, बीड, परभणी प्रकरणावर आक्रमक

Nagpur Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आजपासून (ता.१६) नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन पाच दिवस चालणार असून ते शनिवारपर्यंत (ता. २१) चालणार आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएम, बीड, परभणी प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिल्याच दिवशी बीड, परभणी प्रकरणावरून सरकारने उत्तर द्यावे अशी भूमीका घेतली. यामुळे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले.

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून विरोधकांकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिला. पहिल्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाड सुरू होण्याच्याआधी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, ईव्हीएम, बीड तसेच परभणी संविधान विटंबनेवरून सरकारवर जोरदार निशाना साधला.

विरोधकांनी ईव्हीएमविरोधात रान उठवतं विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय बीडमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचेही फोटो विरोधकांनी झळकावले.

विरोधकांचे संख्याबळ कमी असतानाही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात खडाजंगी पाहायला मिळाली. अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दिला. यानंतर उदय सामंत यांनी पुरवण्या मागण्यांचा प्रस्ताव मांडला. दरम्यान शोकप्रस्ताव सादर होण्याआधीच नाना पटोले यांनी अध्यक्षांकडे परभणी, बीडमधील घटना सरकार आल्यानंतर घडल्याचा आरोप केला.

सभागृहात पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होत असल्यावरून अध्यक्षांनी अधिवेशाचा पहिला दिवस हा शोक प्रस्तावाचा असतो. आपल्या सभागृहाच्या काही परंपरा असून तुम्ही अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. यामुळे नियम तुम्हाला माहित आहे. याबाबतचे प्रस्ताव आले असून मी वेळ देणार आहे. यावर चर्चा होईल, असे सांगत पटोले यांना खाली बसण्यास सांगितले. मात्र अशाच गंभीर घटना राज्यभर होत असून सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अशी मागणी पटोले यांनी केली.

त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, संविधानाचा अवमान कोणतीच सहन करणार नाही. परभणी आणि बीड या दोन्ही घटना गंभीर आहेत. यावर चर्चा करण्याची तयारी सरकारची आहे. विधानसभा अध्यक्ष तारीख देतील किंवा उद्याच यावर वेळ देतील तेव्हा चर्चा करू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT