Rajya Sabha Winter Session : अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेत रणकंदन

Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge Clash in Rajyasabha : राज्यसभेत सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव विरोधकांनी आणला आहे. त्यावरून शुक्रवारी (ता. १२) मोठा गदारोळ झाला.
Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge
Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge Agrowon
Published on
Updated on

New Delhi News : राज्यसभेत सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव विरोधकांनी आणला आहे. त्यावरून शुक्रवारी (ता. १२) मोठा गदारोळ झाला. सभापती जगदीश धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली.

जगदीश धनखड म्हणाले, की एक शेतकऱ्याचा मुलगा या पदावर बसल्याचे तुम्हाला सहन होत नाही. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे. राज्यसभेत गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. तसेच राज्यसभेचे कामकाज सोमवारी होणार आहे.

Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge
Vice President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठराव

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात सभागृहात अविश्‍वास प्रस्ताव आणला गेला आहे. आपल्या विरोधात आणला जाणारा अविश्‍वास प्रस्ताव पक्षपाती असल्याचे धनखड यांनी सांगितले. ते म्हणाले, की मी तुम्हाला पुन्हा एकदा विचार करायला सांगत आहे. मी आतापर्यंत खूप सहन केले.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी दुर्बल होणार नाही. मी या देशासाठी मरेन. शेतकऱ्याचा मुलगा या पदावर का बसला आहे, त्याचा तुम्ही विचार करत नाही. आजचा शेतकरी हा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. धनखड म्हणाले, की तुम्ही आधी नियम वाचा. तुम्ही माझ्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला.

Jagdeep Dhankhar And Mallikarjun Kharge
Maharashtra Politics : शिवसेना, ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता

तो तुमचा अधिकार आहे. परंतु तुम्ही राज्यघटनेची पायमल्ली करत आहात. तुम्ही आमच्या अविश्‍वास प्रस्तावाचे काय झाले, असे वक्तव्य करत आहात. तुमचा प्रस्ताव आला आहे, आता १४ दिवसांनंतर त्यावर निर्णय होईल.

यावर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे. दरम्यान, भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे. १६ आणि १७ डिसेंबर २०२४ रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाइनचा व्हिप जारी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com