Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरल्याने ऊन सावल्यांच्या खेळात पावसाच्या सरी येत आहेत. आज (ता. ३) कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची, तसेच विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..नैॡत्य राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा वरील कमी दाब क्षेत्रापासून ओराई, सिधी, दाल्तोंगज, बंकुरा ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. .रविवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पावसाचा जोर ओसरला असून राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या ते जोरदार सरी सुरूच आहेत. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत घाटमाथ्यावरील कोयना (नवजा) येथे २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..Maharashtra Monsoon: राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली.आज (ता. ३) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे..रविवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२८.६---२२.६अहिल्यानगर---२८.०---२४.३धुळे---२६.०---२०.४जळगाव---२९.५---२३.१जेऊर---३२.५---२२.८कोल्हापूर---२७.९---२२.७महाबळेश्वर---२०.१---१८.७.मालेगाव---२५.०---२१.०नाशिक---२६.९---२२.६निफाड---२७.८---२३.०सांगली---३०.२---२३.०सातारा---२७.८---२२.४सोलापूर---३३.२---२४.६सांताक्रूझ---३१.५---२६.३डहाणू---२९.९---२४.५रत्नागिरी---३१.३---२७.०.Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.छत्रपती संभाजीनगर---२७.६---२२.२धाराशिव---२७.०---२०.८परभणी---३२.०---२३.०परभणी (कृषी)---३२.२---२१.९अकोला---३२.६---२४.६अमरावती---३०.४---२३.३ब्रह्मपूरी---३२.६---२३.१.बुलडाणा---२९.०---२२.५चंद्रपूर---३५.०---२५.२गडचिरोली---३०.२---२४.२गोंदिया---३१.२---२३.२नागपूर---३०.८---२२.८वर्धा---३२.२---२४.६वाशीम---३०.४---२१.०यवतमाळ---३१.०---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.४---२९.५पश्चिम महाराष्ट्र---१८.७---३३.२कोकण---२४.५---३१.५मराठवाडा---२०.८---३२.२विदर्भ---२१.०---३५.०.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.