Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Oilseed Sowing : खानदेशात तेलबिया पेरणी स्थिर राहणार

Rabi Sowing : आगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस अनेकांनी करण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग ये शकतो.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात तेलबियांची पेरणी स्थिर राहणार आहे. पावसामुळे सूर्यफूल पेरणी रखडली आहे. भुईमूग पेरणी सातपुड्यालगत बऱ्यापैकी होईल, असे सध्या दिसत आहे. खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड डिसेंबरमध्ये सुरू होईल. यंदा क्षेत्रात किंचित वाढ होईल, असे चित्र आहे. सूर्यफूल पेरणी या आठवड्यातही होईल, असेही संकेत होते, पण पावसाने नियोजन कोलमडले.

आगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस अनेकांनी करण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग ये शकतो. मागील वेळेसही डिसेंबरमध्ये भुईमूग पेरणी गतीने सुरू झाली होती.

अनेकांनी पेरणी नोव्हेंबरअखेरीस तुषार सिंचनाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे. सर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतील, असेही संकेत आहेत.

मागील हंगामात खानदेशात सुमारे ८०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ९०० हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. मागील वेळेस पाऊसमान कमी होते. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन न मिळाल्याने रब्बी हंगाम जेमतेम होता.

जळगाव जिल्ह्यात सुमारे आठ टक्के पावसाची तूट होती. धुळ्यात २० टक्के व नंदुरबारमध्येही सुमारे २० टक्के कमी पाऊस झाला होता. यंदा अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले. प्रमुख सिंचन प्रकल्पांतूनही रब्बीला पाणी मिळणार आहे. जळगावातील गिरणा, मन्याड, बहुळा, भोकरबारी, अग्नावती, धुळ्यातील अमरावती, अनेर, पांढरा, बुराई आदी प्रकल्पांतून पाणी मिळेल.

सूर्यफुलासह भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार भागातही होईल. कारण पाऊसमान चांगले आहे.

चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी

खानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील धुळे, साक्री आदी भागांत भुईमुगाची पेरणी होईल. तसेच सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा भागात पेरणी स्थिर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी होईल, अशी माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT