Kolhapur Sugar Office agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugar Office : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला कोणी वालीच नाही, अधिकारी टाळे ठोकून झाले गायब

Andolan Ankush : आंदोलन अंकुशचे पदाधिकारी गत हंगामातील ठरलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गेले होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार दिसला.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Rate : प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दालन सहा दिवसांपासून बंद आहे. सहसंचालकांचे दालन स्वत:च बंद करून ते ३१ जुलैनंतर अद्यापही कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत, अशी धक्कादायक चित्र पाहायला मिळाले आहे. आंदोलन अंकुशचे पदाधिकारी गत हंगामातील ठरलेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गेले होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार दिसला.

साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ठरलेला दुसरा हप्ता द्यावा, यासाठी आंदोलन अंकुशकडून १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. याचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलन अकुंशच्या पदाधिकाऱ्यांना साखर सहसंचालक कार्यालयालयाला टाळे ठोकून बंद असल्याचे दिसले. त्यांनी त्या टाळ्यावर ३१ जुलैपासून हे बंद असल्याचे दिसले.

दरम्यान, गत हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाच्या दरम्यान पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी अशा दोन बैठका झाल्या होत्या. त्या बैठकीनंतर झालेल्या तोडग्यात जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता देण्यास तयार असल्याची संमतीपत्रे दिली होती व त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

त्या शेवटच्या बैठकीत पालकमंत्र्यांची याला संमती घेऊन तसे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्हा पोलिसप्रमुखही बैठकीला उपस्थित होते. मात्र, अद्यापही हा हप्ता दिलेला नाही. यावेळी, आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT