Kolhapur ZP Subsidy : जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर मिळणार कडबाकुट्टी, शेळी गट; असा करा अर्ज

Animal Department : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून २०२४-२५ मधील ही योजना जाहीर केली आहे.
Kolhapur ZP Subsidy
Kolhapur ZP Subsidyagrowon
Published on
Updated on

Kolhapur Zilla Parishad : जिल्हा परिषद स्वनिधीमधून ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र आणि ७५ टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या, दारिद्र्यरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप केली जाणार आहे. पात्र लाभार्थींनी अर्ज देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज केले.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून २०२४-२५ मधील ही योजना जाहीर केली आहे.

कार्तिकेयन एस. म्हणाले, ‘जिल्ह्यात ३.५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप केले जाणार आहे. लाभार्थीकडे लहान-मोठी किमान ५ जनावरे असणे गरजेचे आहे. लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी जमीन असावी, वीज जोडणी असावी, इतर योजनेतून कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घेतलेला नसावा.

Kolhapur ZP Subsidy
Kolhapur Flood : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे झाले बंद, आलमट्टीचा विसर्ग केला कमी, पाणी पातळीत इंचाइंचाने घट

तसेच ४.७५ टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या, दारिद्र्यरेषेखालील महिलांना २ शेळी गट वाटप केले जाणार आहे. योजनेतील लाभार्थीचे वय १८ ते ६० दरम्यान असावे, लाभार्थीकडे शेळीपालनासाठी पुरेशी जागा असणे गरजेचे आहे.’

१५ ऑगस्टअखेर पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com