Landslide
Landslide Agrowon

Landslide : पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या पंचाळे खुर्दमधील डोंगराला भेगा! भूस्खलनाची भीती

Malin Tragedy : पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेने अख्ख्या राज्याला सुन्न केलं होतं. त्या आठवणी आजही ताज्या असतानाच जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पंचाळे खुर्द येथील डोंगराला भेगा पडल्याने नागरीक भीतीच्या छायेखाली आहेत.   
Published on

Pune News : राज्यात २०१४ साली मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील माळीण अख्खे गाव झोपेत असतानाच गाडले गेले होते. या आठवणी आजही १० वर्षानंतर ताज्या आहेत. यादरम्यान आता जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पंचाळे खुर्द गाव भूस्खलनाच्या भीती खाली आले आहे. येथील डोंगराच्या पायथ्याला आणि गावच्या दोन्ही बाजूला जमिनीला भेगा गेल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ ला भूस्खलन झाले होते. यात अख्खे गाव पहाटे झोपेट असतानाच भूस्खलन झाल्याने गाडले गेले होते.या दुर्दैवी घटनेत किमान १५१ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेला यंदा १० वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान पुन्हा एकदा माळीण सारखी घटना जिल्ह्यात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम असणाऱ्या डोंगर भागातील पंचाळे खुर्द या गावात सध्या भूस्खलनाची भीती नागरीकांमध्ये दिसत आहे. येथील डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्याने भूस्खलन होण्याची शक्यता आहे. यामुळे गावात गावकऱ्यांनी शासनाने येथील पाहणी करावी. तसेच रहिवाशांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

Landslide
Wayanad Landslide : वायनाडच्या भूस्खलनातील मृतांची संख्या तीनशेवर

आदिवासी भागात डिंभे धरणालगत असलेल्या पंचाळे खुर्द गावाच्या दुसऱ्या बाजूला जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. येथील डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या जमिनीला २ ते ३ फूट खोल आणि ६० ते ७० फूट लांब भेगा गेल्या आहेत. याआधी देखील येथे २००३ मध्ये असेच भूस्खलन झाले होते. तर भूगर्भ तज्ज्ञांनी जमिनीची पाहणी करून येथील ४५ कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्याची शिफारस केली होती. 

या शिफारशीनंतर सरकारने पुनर्वसनाची घोषणा करत सोपस्कार पार पाडले होते. मात्र अद्यापही येथील ४५ कुटुंबाचे पुनर्वसन झालेले नाही. तर यंदा पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील डोंगराला भेगा गेल्या आहेत. यावरून येथे माळीणसारखी दुर्दैवी घटना घडण्याची वाट सरकार पाहतयं का? अशी विचारणा गावकऱ्यांनी केली आहे. 

Landslide
Landslide Victims House : भूस्खलन पीडितांसाठी शंभर घरे बांधणार

तसेच कोणतीही घटना घडण्याआधी गावातील लोकांचे तात्काळ पुनर्वसन करावे. त्यासाठी शासनाने गावठाणाची मोजणी देखील केली आहे. तेथेच पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

भूस्खलनाच्या मोठ्या घटना

दरम्यान २०२१ मध्ये रायगड जिल्ह्यातीलच महाड तालुक्यात दरड कोसळून तळीये गाव उद्ध्वस्त झालं होतं. येथे ३५ घरे जमीनदोस्त झाली होती. तर जवळजवळ ८५ जणांचा मृत्यू झाला होता. तर अशीच घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी येथे २०२३ साली घडली होती. येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने अख्खं गाव गाढ झोपेत असतानाच मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. या घटनेत जवळजवळ १५१ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर आता २०२४ मध्ये केरळमधील वायनाडमध्ये देखील भूस्खलन होऊन ३०० च्या वर मृत्यू झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com