Education
Education Agrowon
ॲग्रो विशेष

Education Policy : पाचवी, आठवीत पास होण्याचे विद्यार्थ्यांवर बंधन

हेमंत पवार

Karad News : सरकारने आरटीई अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण २०१० पासून लागु केले. मात्र अनेक विद्यार्थी दहावी, बारावीत अभ्यासक्रमात मागे पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी अभ्यास डोईजड झाल्याने मधूनच शाळा सोडल्याचेही प्रकार घडले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला.

त्याचा विचार करुन शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढुन त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय चांगल्या पध्दतीने समजावे या हेतूने आता धोरण बदलले आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासुन पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत पास होण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ते विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांना पुर्नपरिक्षेची मिळणार संधी

पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांना पुन्हा एकदा संधी पास होण्याची संधी शिक्षण विभागाकडुन देण्यात येणार आहे. संबंधित नापास झालेल्या विद्यार्थ्यांची एक महिन्यानंतर पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा घेण्यात येईल.

त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र जे विद्यार्थी नापास होतील त्यांना त्याच वर्गात बसावे लागेल, असा नवा बदल या धोरणात करण्यात आला आहे.

प्रश्नपत्रीकांसाठी नवी पध्दती

शिक्षण विभागाच्या नवीन धोरणानुसार आता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परिक्षा पासच व्हावी लागणार आहे. मात्र त्यासाठी प्रश्नपत्रीका या शाळा स्तरावरच काढल्या जाणार नाहीत. नवीन धोरणानुसार शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्‍नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तींवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता कस लागणार आहे.

जुने धोरण बदलण्याची कारणे

* सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्यामुळे गुणवत्ता धोक्यात

* स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकणे झाले अवघड

* दहावी, बारावी गुणवत्तेत विद्यार्थी पडले मागे

* अनेकांनी शिक्षण अवघड जात असल्याने मधूनच सोडली शाळा

* काही विद्यार्थ्यांना इंग्रजी, सायन्स समजणे गेले अवघड

* काही विद्यार्थी सातत्याने काही विषयात झाले नापास

नवीन धोरणामुळे हे होतील बदल

* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर देण्यात येणार भर

* इंग्रजी, गणित, विज्ञान विषयावर करण्यात येणार फोकस

* पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होण्याचे बंधन

* नापास झालेल्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसावे लागणार

* सुरुवातीपासुनच विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार

* विद्यार्थ्यांच्या वर्गातच सातत्याने घेतल्या जाणार परिक्षा

शालेय शिक्षण विभागाने आरटीई कायद्यानुसार पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे २०१० पासून पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. आता मात्र शिक्षण विभागाने पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाता येणार नाही.
संम्मती देशमाने - शिक्षणाधिकारी, कऱ्हाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT