Dr. Pramod Chaudhari
Dr. Pramod ChaudhariAgrown

New Education Policy : नवीन शिक्षण धोरणाचा उद्योग क्षेत्राला फायदा

Maratha Chambers Of Commerce : पुणे शहर आणि परिसर उद्योगांच्या नवीन स्टार्टअपसाठी प्रसिद्ध होत आहे. यातून पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक तयार होत आहेत.
Published on

Pune News : ‘‘पुणे शहर आणि परिसर उद्योगांच्या नवीन स्टार्टअपसाठी प्रसिद्ध होत आहे. यातून पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक तयार होत आहेत. उद्योग क्षेत्रात शाश्वतता महत्त्वाची ठरत आहे. त्यासाठी कंपन्या देखील प्रयत्न करीत आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे (एनर्इपी) कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्याचा उद्योग क्षेत्राला फायदा होऊन अधिक चांगली उत्पादने तयार होतील,’’ असा विश्वास प्राज उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केला.

उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (ता. १९) डॉ. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

Dr. Pramod Chaudhari
Education Policy : राज्यातील ५१६ शाळा आता होणार आदर्श

डॉ. चौधरी म्हणाले,‘‘पुणे शहरात उद्योग क्षेत्र वाढत आहे. नवउद्योजकांना प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार आवश्यक आहेत. या सन्मानातून समाजमान्यता देखील मिळते. त्यामुळे चेंबरने हे पुरस्कार गेली ७६ वर्ष सुरू ठेवले याबद्दल त्यांचे अभिनंदन.’’

‘पुण्यात स्टार्टअपची संख्या वाढतेय’

‘‘पुण्यात स्टार्टअपची संख्या देखील वाढत आहे. यातून पहिल्या पिढीतील तरुण उद्योजक तयार होत आहेत. ज्या उद्योजकांना हे पुरस्कार मिळाले आहेत ते भविष्यात मोठी रोजगार निर्मिती करतील,’’ अशी अपेक्षा डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली.

Dr. Pramod Chaudhari
Education Policy : नापास मुलांचं खच्चीकरण सरकारच करतंय?

करंदीकर यांनी ‘एससीसीआयए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाकाळात आम्ही देश व परदेशातील विविध उद्योगांना भेट देत तेथील संधी आपल्या उद्योजकांना उपलब्ध करून दिल्या.’’

गिरबने यांनी पुरस्कारामागील भूमिका मांडली. शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक अनेकांना प्रेरणा देणारे आहेत. उद्योजकतेचा विकास व्हावा म्हणून त्यांचा सन्मान केला जात आहे,’’ असे ते म्हणाले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. गिरबने यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com