Education Policy : नापास मुलांचं खच्चीकरण सरकारच करतंय?

Education Update : नापास होणारी मुलं कोणत्या आर्थिक स्तरातील, सांस्कृतिक समूहातील असणार आहेत? हे उघडं गुपित आहे.
Education Policy
Education PolicyAgrowon
Published on
Updated on

भाऊ चासकर

Education system : पाचवी आणि आठवीत वार्षिक परीक्षांची सक्ती करून विद्यार्थ्यांना नापास करायचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यात तशी सुधारणा राज्य शासनाने केली आहे.

ना-नापास धोरणामागे मोठी विचारप्रक्रिया होती. सध्या अनेक शिक्षक नापास करायच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे याचे नवल वाटते. . मात्र याचा नीट विचार करायला हवा. नापास केल्यामुळे विद्यार्थी चांगले शिकतात, अशाप्रकारचे एखादे संशोधन असल्यास कृपया मला सांगा.

Education Policy
Education System : परदेशी विद्यापीठांबद्दलची ओरड अनाठायी

मी स्वतः वारंवार नापास झालेले एक मूल आहे आणि नापास केल्यानंतर तो नापाशीचा शिक्का कपाळी बसतो, तेव्हा आतल्या आत काय पडझड होते? केवढी निराशा येते, हे कधीही नापास न झालेल्यांना कधीच कळणार नाही.... मुलांना शिकवणे महत्त्वाचे की नापास करून खच्चीकरण करायचे, याचा साकल्याने विचार करायला हवा.

नापास होणारी मुलं कोणत्या आर्थिक स्तरातील, सांस्कृतिक समूहातील असणार आहेत? हे उघडं गुपित आहे.

नापास होणारी मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली जातील. पर्यायाने स्वस्तात घरगडी, शेतमजूर, ड्रायव्हर, कारखान्यात कामगार आणि एकूणच रामा गडी मिळण्याची व्यवस्था भांडवलदारांनी करून घेतली आहे का?

परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटता कामा नये. खरं म्हणजे मुलं नापास होतात ना तेव्हा सरकार म्हणजे अख्खी शिक्षण व्यवस्था नापास झालेली असते. तेव्हा नापासीचे खापर केवळ मुलांच्या माथ्यावर का फोडले जाते आहे? आपली धोरणं नापास झाली आहेत, असं सरकार मान्य करणार आहे का? या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com