Nagpur News: इराण-इस्राईल युद्ध आणि अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे शहरातील घाऊक सुकामेवा बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. आखातातून येणाऱ्या सुका मेव्याची आवक घटली आहे. परिणामी, पिस्ता, शहाजिरे, अंजीर, बेदाणा दरात प्रति किलो १०० ते २५० रुपयांची मोठी वाढ झाली आहे..विशेष म्हणजे रमजानच्या महिनाभरापूर्वीच व्यापाऱ्यांनी मोठा साठा करून ठेवल्यामुळे सध्याची ही दरवाढ काहीशी मर्यादित आहे. मात्र पुढील १५ दिवसांत युद्धविराम झाला नाही तर लग्नसराईच्या काळात सुक्यामेव्याच्या किमतीत आणखी २० टक्क्यांनी वाढ होण्याची दाट शक्यता आहे..Dry Fruit Imports India : ट्रम्प यांनी इराणाला दिलेल्या इशाऱ्यानंतर भारतीय सुका मेवा व्यापाऱ्यांची चिंता वाढली; आयात ठप्प होण्याची भीती .इराणमधील बंदर अब्बास पोर्टलवरील कामकाज ठप्प झालेले आहे. सागरी मार्गावरील जोखीम वाढल्याने इराणहून येणाऱ्या पिस्ता आणि शहाजिऱ्याची पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घाऊक बाजारात इराणच्या पिस्त्याच्या किमतीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. जो पिस्ता पूर्वी २०५० रुपयांना उपलब्ध होता, तो आता २३०० रुपयांच्या पार गेला आहे. किरकोळ बाजारात तर हाच दर २४०० ते २८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापसावर दबाव कायम, भेंडी- आल्याचे दर टिकून तर कोथिंबीरला उठाव.प्रीमियम मसाल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या शहाजिऱ्याचे दरही ८२० रुपयांवरून ८५० रुपयांपर्यंत वधारले असून किरकोळ विक्रीत ग्राहकांना यासाठी १००० ते ११०० रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळे तोरखम आणि चमन बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. हजारो मालवाहू ट्रक सीमेवर अडकल्याने बाजारपेठेत अंजीर आणि बेदाणाची टंचाई निर्माण झाली आहे..अंजीर, बेदाणा दरही वाढलेबाजारभावात अंजिराच्या किमतीत प्रति किलो १०० रुपयांची थेट वाढ झाली आहे. गुणवत्तेनुसार त्याचे दर ५०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. काळ्या आणि लाल बेदाणा दरातही १०० ते १५० रुपयांची तेजी आली आहे. ते आता ६०० ते ८५० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. सध्या बाजारपेठ पूर्णपणे जुन्या साठ्यावर अवलंबून आहे. लग्नसराईच्या हंगामात सुक्यामेव्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.