Sericulture Agrowon
ॲग्रो विशेष

Uzi Fly Control: उझी माशीसाठी निसोलिनक्स थायमस वापर पर्यावरणपूरक

Eco Friendly Farming: ‘‘उझी माशीच्या नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस परोपजीवी किटकांचा वापर पर्यावरणपूरक आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या परोपजीवी कीटकाच्या पाऊचचा (एन.टी.पाऊच) वापर करणे गरजेचे आहे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News: ‘‘उझी माशीच्या नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस परोपजीवी किटकांचा वापर पर्यावरणपूरक आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या परोपजीवी कीटकाच्या पाऊचचा (एन.टी.पाऊच) वापर करणे गरजेचे आहे,’’ अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी दिली.

मराठवाड्यात रेशीम शेतीचा विस्तार झाला आहे. सातत्याने वर्षभर कोष उत्पादन घेतले जात आहेत. रेशीम किटकांवर उझी माशीचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे. या माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषाचे साधारणतः १५ ते २० टक्क्यांपर्यंत, तर जास्त प्रादुर्भाव झाल्यास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

उझी माशीचा जीवनक्रम १८ ते २२ दिवसांत पूर्ण होतो. प्रादुर्भावग्रस्त रेशीम किटकांच्या शरीरावर काळे डाग दिसतात. माशीच्या नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस (एन.टी.) या परोपजीवी कीटकांचे संगोपन करणे गरजेचे आहे. १०० अंडीपुंजासाठी या परोपजीवी कीटकाचे तीन पाऊच लावावेत.

रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर निसोलायनेक्स थायमसचे पाऊच रॅकच्या खालच्या बाजुने मध्यभागी लावावेत. असा सल्ला रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेमध्ये निसोलायनेक्स थायमस पाऊच (एन.टी.पाउच) उत्पादन सुरू आहे. आगाऊ रक्कम अदा करून मागणी केली तर कुरियरच्या साह्याने एन.टी.पाऊच पाठवले जातात. अधिक माहितीसाठी संपर्क (डॉ.संजोगबोकन ९९२१७५२०००).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज

Farm Relief: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करा

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता पती, वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक, काय आहे नवीन नियम

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

SCROLL FOR NEXT