nirmala sitaraman agrowon
ॲग्रो विशेष

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला अर्थ मंत्रालयाचा कार्यभार 

PM Modi 3.0 Cabinet : निर्मला सीतारामन यांच्याकडे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देखील अर्थ मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (ता.१२) अर्थ मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील नव्या मंत्रिमंडळात निर्मला सीतारामन यांचा समावेश झाला आहे. सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सीतारामन यांनी बुधवारी (ता.१२) पदभार स्वीकारला. तर सीतारामन पुढील महिन्यात २०२४-२५ साठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२४ मध्ये संसदेत अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.

सीतारामन भारतातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असून त्यांनी संसदेत २०१९ मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर आता त्या जुलैमध्ये अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. २०२४-२५ पूर्ण अर्थसंकल्पासाठी विशेष अधिवेशन २४ जून ते ३ जुलैच्या दरम्यान बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थ संकल्प हा १ जुलैला सादर केला जाऊ शकतो. 

सातवा अर्थसंकल्प 

अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांची ही दुसरी टर्म आहे. तर जुलै २०२४ मध्ये त्यांच्या कार्यकाळातील पहिला पूर्णवेळ अर्थसंकल्प त्या सादर करतील. अर्थमंत्री म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी ५ पूर्ण आणि १ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे त्यांचा हा सातवा अर्थसंकल्प असेल. यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग ६ अर्थसंकल्प सादर करण्याचा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम देखील मोडतील.

एक्सवर व्हिडिओ समोर आला

पीटीआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली आहे. पीटीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात म्हटले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. या व्हिडिओमध्ये विभागातील कर्मचारी सीतारामन यांचे स्वागत करत असल्याचे दिसत आहे.

सीतारामन यांचा राजकीय प्रवास

सीतारामन यांची राजकीय कारकीर्द २००६ मध्ये सुरू झाली. तर २०१० मध्ये त्यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांनी उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. २०१९ मध्ये सीतारामन यांना प्रथमच अर्थमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर त्यांनी अर्थमंत्री म्हणून ५ जुलै २०१९ रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT