Nirmala Sitharaman : यूपीए सरकारने सोन्याचे शेण केले; अर्थमंत्री सीतारामन यांनी केली टीका

Union Finance Minister Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा तत्कालीन काँग्रेसच्या यूपीए सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी यूपीए सरकारने सोन्याचे शेण केले अशी टीका केली.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanAgrowon

Pune News : शनिवार (१० रोजी) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी, काँग्रेसला संधीचे सोने करता आले नाही. तर सोन्याचे शेण कसे करावे हे काँग्रेस माहित असल्याची टीका केली आहे. ही टीका त्यांनी राज्यसभेत श्वेतपत्रिकेवर चर्चा करताना केली.

सीतारामन यांनी ८ फेब्रुवारी रोजी लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका सादर केली होती. त्यावर त्यांनी आज आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी २०१४ साली मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था हाती घेतली तेव्हा ती नाजूक अवस्थेत होती. पण मोदी सरकारने कठोर निर्णय घेत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणली असे म्हटले आहे.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitaraman : ग्राहकांना प्राधान्य द्यावेच लागेल

तसेच त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील खराब अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना, काँग्रेसवाले फक्त महागाई, महागाई म्हणतात. त्याचे ते आकडे टाकतात. पण अटलबिहारी वाजपेयींच्या एनडीए सरकारच्या शेवटच्या वर्षात महागाई ४% च्या खाली होती. पण काँग्रेसच्या यूपीए सरकारने बेफिकीर आर्थिक धोरण आणि फालतू खर्च यामुळे त्याचा नाश केला.

Nirmala Sitharaman
Budget 2024 : अंतरिम बजेटच्या पेटाऱ्यातून निर्मला सीतारामन जनतेला काय?

काँग्रेसच्या यूपीए सरकारने देशाची अर्थ व्यवस्था ही काट्यांमध्ये अडकवली. अर्थव्यवस्थेची 'स्थिती' अशी होती की ती जगातील पाच सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थांपैकी एक होती. पण गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने ही अर्थव्यवस्था काट्यांमध्ये अडकलेल्या साडीप्रमाणे सुरक्षितपणे बाहेर काढली. सरकारच्या प्रयत्नांमुळे आज ती जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ती आम्ही विकासाभिमूख सुधारणांच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

तसेच सीतारामन यांनी, श्वेतपत्रिका आणण्याचे कारण सांगत, ती आता एका विशिष्ट पातळीवर आणली आहे. जी आपल्याला आत्मविश्वास देते. तर पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे तिसऱ्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नक्कीच पोहोचेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com