Nira-Bhima Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Elections: ‘नीरा-भीमा’साठी दहा अर्ज दाखल

Nira-Bhima Sugar Factory Election: इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५ उमेदवारांचे १० अर्ज दाखल झाले असून, हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनीही प्रत्येकी अनेक अर्ज सादर केले आहेत. या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Team Agrowon

Indapur News: इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन, तर त्यांच्या पत्नी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या २१ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारअखेर (ता. २१) पाच उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झाले आहेत.

नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीकरिता सोमवारपासून (ता. १७) अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दिवशी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष लालासाहेब देविदास पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पद्मजा संदीपान कांबळे यांचा एक व संदीपान मारुती कांबळे यांचे तीन, असे एकूण चार अर्ज दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१) हर्षवर्धन पाटील यांनी बावडा गटातून आणि ब वर्ग प्रतिनिधीमधून असे दोन अर्ज दाखल केले आहेत, तर त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी बावडा गटातून ब वर्ग प्रतिनिधीमधून आणि महिला वर्गातून, असे तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.

जगदाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष

कारखान्याची स्थापना झाल्यापासून कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, गेल्या काही काळापासून नीरा भीमा कारखाना कार्यक्षेत्रातील मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या अप्पासाहेब जगदाळे यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कारखान्यावर शेतकऱ्यांशी निगडित विविध प्रश्नांवर जोरदार आंदोलन केले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT