Nilwande Dam Water Agrowon
ॲग्रो विशेष

Nilwande Dam : निळवंडे कालव्याच्या वरील भागाला पाण्यासाठी पाठपुरावा सुरू ः थोरात

Balasaheb Thorat : निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले.

Team Agrowon

Ahilyanagar News : निळवंडे धरण हे आपल्या जीवनातील ध्यासपर्व मानून आपण सातत्याने काम केले. मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदांच्या माध्यमातून धरण व कालव्यांच्या कामासाठी निधी मिळवला व काम सुरू ठेवले.

आता उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच आहे, असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

घुलेवाडी (ता. संगमनेर) येथील भेंडाळे बंधारा येथे साडीचोळी अर्पण करून पाण्याचे जलपूजन श्री. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच निर्मला राऊत, नवनाथ आरगडे, भाऊसाहेब पानसरे, बाळासाहेब पानसरे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, ‘निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात आता जलसमृद्धी निर्माण झाली आहे.

अनेक गावांना या धरणाचे पाणी मिळाले असून कालव्यांच्या वरच्या बाजूस असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही पाणी मिळवून देण्यासाठी आपण नियोजित आराखडा तयार केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT