Ramchandra Gavhane Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Help : दोन वेळा बैलजोडी चोरी गेलेल्या शेतकऱ्याला नेटकऱ्यांची मदत

Buy a pair of bullocks : समाज माध्यमातून केलेल्या आवाहनाला नेटकऱ्यांनी प्रतिसाद देत चार दिवसांत ऐंशी हजार रुपये जमा झाले. यातून नवीन बैलजोडी खरेदी केली.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : कलदगाव (ता. अर्धापूर) येथील एक एकर शेती असलेल्या रामचंद्र गव्हाणे या शेतकऱ्याची एका वर्षात दोनवेळा बैलजोडी चोरीला गेली. या घटनेमुळे नैराश्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे पुढे आले. त्यांनी समाज माध्यमातून केलेल्या आवाहनाला नेटकऱ्यांनी प्रतिसाद देत चार दिवसांत ऐंशी हजार रुपये जमा झाले. यातून नवीन बैलजोडी खरेदी केली.

मागील अनेक वर्षांपासून कलदगाव रामचंद्र संभाजी गव्हाणे बैलजोडीच्या साथीने आजूबाजूच्या शेतीतील शेतीकामे करून उदरनिर्वाह करीत असे. अशातच त्यांची बैलजोडी दोन वेळा चोरीला गेली, यामुळे त्यांचे कुटुंब हतबल झाले होते.

ही बाब संतोष गव्हाणे यांना समजल्यानंतर त्यांनी दानशूर व्यक्तीच्या मदतीतून बैलजोडी घेऊन देण्याचा संकल्प केला. समाज माध्यमातून आवाहनानुसार मित्र,दानशूर व्यक्तींच्या मदतीतून चार दिवसांत ऐंशी हजार जमा झाले.

त्यातून मंगळवारी (ता. ६) वसमत (जि. हिंगोली) येथील बैल बाजारातून लाल कंधारी बैलजोडी खरेदी केली. यानंतर ही बैलजोडी रामचंद्र यांना शेतावर जाऊन संतोष गव्हाणे यांनी सुपूर्द केली. या वेळी नवीन बैलजोडी पाहून कुटुंबाला आनंदाश्रूही आले.

या समाजात संकटात सापडलेल्या एखाद्या कुटुंबाला मदत करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बैलजोडी भेट होय. यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार. तसेच बैलजोडी चोरीप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवून घेतले जात नाहीत. यापुढे जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून लढा उभारू.
संतोष गव्हाणे पाटील, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT