Forest Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Forest Department : दरवर्षी जव्हारच्या डोंगर व जंगलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, वेलवर्गीय वनस्पती उगवत असतात.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यापासून येथील नागरिक गुजराण करत असतात. मात्र, अचानक वणवे लागून जंगले नष्ट होत असल्याने वनसंपत्ती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वणवे या विषयावर जव्हार वन विभागामार्फत एक मोहीम राबवून जनजागृती करण्याची मागणी केली जात आहे.

दरवर्षी जव्हारच्या डोंगर व जंगलात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडेझुडपे, वेलवर्गीय वनस्पती उगवत असतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान या उगवलेल्या गवत व इतर वनस्पती वाळू लागतात.

यादरम्यान डोंगर, जंगलातील मोठ्या झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडलेला असतो. याच वाळलेले गवत व इतर वनस्पती; तसेच पालापाचोळ्याला अनेकदा वणवे लावण्याचे प्रकार काहींकडून लावले जातात. अनेकदा गैरसमजुतीनेही वणवे लावले जातात.

या वणव्यामध्ये अनेकदा संपूर्ण डोंगरच्या डोंगर, जंगले जळून खाक होऊन निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. यात वनसंपदा नष्ट होतात. अनेकदा पशू-पक्षी, वन्यप्राणी होरपळून निघतात. त्यामुळे वणवे नियंत्रणासाठी आत्तापासूनच वन विभागाकडून जनजागृती; तसेच वन वणवा याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा घेण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

भूगर्भातील जलस्रोतांवर परिणाम

गवत, पालापाचोळा जळून गेल्यामुळे पाऊस पडला तरी पावसाचे पाणी डोंगररांगांत साचले जात नाही. ते थेट नदीकडे वाहत असते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. काही अंशी याचा परिणाम भूगर्भातील जलस्रोतांवर होत आहे.

जव्हार तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वणवे लागतात. वन विभागाकडून मोजक्याच ठिकाणी कारवाया केल्या जातात. मात्र, फक्त जनजागृती किंवा कारवाया करून वणवे नियंत्रित होणार नाहीत. यासाठी ज्या ग्रामपंचायत हद्दीत वणवे लागणार नाहीत, अशा ठिकाणी वन विभागाने बक्षिसे द्यावीत. वणवे लागणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रांवर कारवाई करावी. यामुळे बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल.
- जितेंद्र पाटील, अध्यक्ष, वन्यप्रेमी मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT