Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : नवाब मलिक प्रतीक्षेत, संजय पाटील, टिंगरेंना संधी

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शुक्रवारी (ता. २५ ) सात उमेदवारांची यादी जाहीर केली.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शुक्रवारी (ता. २५ ) सात उमेदवारांची यादी जाहीर केली. माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना, जयंत पाटील यांच्या विरोधात इस्लामपुरातून निशिकांत पाटील आणि पोर्शे कार अपघात प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे.

तर शिवाजीनगर-मानखुर्दमधून उमेदवारीचे दावेदार मानले जाणाऱ्या नवाब मलिक यांना या यादीत स्थान देण्यात आले नाही. दिल्लीत झालेल्या खलबतामध्ये मलिक यांच्या नावावर फुली मारल्याचे समजते. त्याऐवजी सना यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सातपैकी पाच उमेदवार भाजप आणि शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीत भाजपमधून आलेल्या पाच नेत्यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील वडगाव शेरीतील आमदार सुनील टिंगरे यांचा पत्ता कापला जाईल, असे बोलले जात होते. तसेच शरद पवार यांनी टिंगरे यांच्या मतदारसंघात सभा घेऊन दिवटा आमदार अशी संभावना केली होती.

त्यामुळे टिंगरे यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी देण्याची वदंता होती. मात्र, त्यांना संधी देण्यात आली आहे. सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांना तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित यांचे आव्हान असेल, नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील- चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून, सांगली ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष राहिलेल्या निशिकांत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यावर कडवी टीका करणारे आमदार सदाभाऊ खोत हे पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व तर शिवसेना ठाकरे पक्षातून आलेल्या माऊली कटके यांना आमदार अशोक पवार यांच्याविरोधात शिरूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या आधी राष्ट्रवादीने ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून एकूण ४५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या यादीतील उमेदवार

निशिकांत पाटील : इस्लामपूर, संजय पाटील : तासगाव-कवठेमहांकाळ, प्रताप पाटील चिखलीकर : लोहा, झिशान सिद्दीकी : वांद्रे पूर्व, सुनील टिंगरे : वडगाव शेरी, ज्ञानेश्वर कटके : शिरूर, सना मलिक : अणुशक्तीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT