Sugar Factory Owners Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत गुरुवारी (ता.२४) महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ८ साखर कारखानदार उमेदवारांनी अर्ज भरले. जोरदार शक्तीप्रदर्शन करत हजारो कार्यकर्तांच्या उपस्थितीत सर्वच नेत्यांनी मुहूर्त साधत अर्ज दाखल केले. विधानसभेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे जिल्ह्यात दिसून आले. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २२ उमेदवारांनी ३४ अर्ज जिल्ह्यातून दाखल झाले.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मुहूर्त साधण्यासाठी साधेपणाने अर्ज दाखल केला, तर याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी अर्ज जोरदार सभा घेत अर्ज दाखल केला.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी राधानगरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतःच्या शाहू आघाडीतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. कागलमधून शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी अर्ज भरला.
जनसुराज्य पक्षाचे महायुतीचे घटक असलेल्या आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी पन्हाळामधून अर्ज भरुन सभाही घेतली, तर, इचलकरंजीत राहुल आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अर्ज दाखल केला तर शाहूवाडीमधून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनीही अर्ज दाखल केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.