Natural Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Sugar Factory : ‘नॅचरल शुगर’च्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन

Sugarcane Crushing Season : यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने ऊस पिकास मे महिन्यातील उष्णतेची झळ न पोहोचल्याने ऊस पिकाची अत्यंत जोमाने वाढ होत आहे.

Team Agrowon

Dharashiv News : रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. या कारखान्यात गळीत हंगाम २०२५-२६ ची पूर्व तयारी पूर्ण करण्याच्या दृष्टीने बुधवारी (ता. ११) मिल रोलरचे पूजन नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी श्री. ठोंबरे म्हणाले, की यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने ऊस पिकास मे महिन्यातील उष्णतेची झळ न पोहोचल्याने ऊस पिकाची अत्यंत जोमाने वाढ होत आहे.

त्यामुळे जून उजाडताच ऊस पीक परिस्थिती समाधानकारक दिसून येत असल्याने व कारखान्याकडे मागील ऊस लागवड हंगामातील ऊस नोंद आवश्यतेप्रमाणे झालेली असल्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ठेवलेले गाळपाचे १२ लाखांचे उद्दीष्ट गाठण्यासाठी आवश्यक तेवढा ऊस उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रसामुग्रीची साफसफाई, दुरुस्ती व देखभालीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. कारखाना जास्तीत जास्त कार्यक्षमतेने चालणार असल्याने तसेच कार्यक्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या उसाचे जास्तीत जास्त १२ लाख टनांचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

श्री. ठोंबरे यांनी सांगितले, की निर्धारित वेळेत कारखाना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडयात सुरू होणार आहे. येत्या हंगामामध्ये आपण ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे म्हणजेच १२ लाख टन ऊस गाळप होणार आहे.

या प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड, राजपाल माने, संभाजीराव रेड्डी, प्रवर्तक किशोर डाळे, बाबूराव जाधव, माणिकराव मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT